भुलीचे इंजेक्शन घेवून संपवले जिवन
कोल्हापूर प्रतिनिधी
उच्च शिक्षीत डॉक्टर तरुणीने भुलीच्या इंजेक्शनचा अतिरिक्त मात्रा घेवून आत्महत्या केली. अपुर्वा प्रविणचंद्र हेंद्रे (वय 30 रा. ताराबाई पार्क) असे मृत तरुणीचे नांव आहे. या घटनेची नोंद शाह्tपुरी पोलीस ठाण्यात झाली रविवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुप्रसिद्ध डॉक्टर प्रविणचंद्र हेंद्रे यांची मुलगी अपुर्वा ह्या एमएसचे शिक्षण घेवून सध्या डी. वाय. पाटील महाविद्यालयामध्ये लेक्चरर म्हणून कार्यरत होत्या. शनिवारी रात्री त्यांच्या मित्रांची पार्टी होती. पार्टी आटोपून 1 वाजण्याच्या सुमारास त्या घरी परतल्या. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास कोणालाही काहीही न सांगता त्या घरातून बाहेर पडल्या. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ताराबाई पार्क येथील डी-मार्टच्या दारात एका तरुणी बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसून आले. तेथील नागरीकांनी या घटनेची माहिती शाहुपुरी पोलिसांना दिली. याच दरम्यान डॉ. प्रविणचंद्र हेंद्रे हे मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गेले होते. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत इंगवले हे पथकासमवेत डॉ. हेंद्रे यांना घेवून घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सदरची तरुणी अपुर्वा असल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळी तिला उपचारासाठी सिपीआर रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापुर्वीच तिचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तिच्या पश्च्यात वडील, आई, भाउ असा परिवार आहे.
विरोनियमचे इंजेक्शन
भूल देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विरोनियम इंजेक्शनची बाटली, सिरींज अपुर्वाच्या मृतदेहा शेजारी आढळून आली. विरोनियमची मात्र 10 सिसीपेक्षा जास्त झाल्यास मृत्यू ओढावू शकतो. इंजेक्शन घेतल्यापासून 3 ते 4 मिनीटातच मेंदू, व हदय ब्लॉक होवून काही क्षणातच मृत्यू होतो.
ऑफीसस्टाफची पार्टी
अपुर्वा शनिवारी रात्री ऑफीसस्टाफ सोबत पार्टी करण्यासाठी गेल्या होत्या. रात्री 1 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या एका डॉक्टर सहकाऱ्याने त्यांनी घरी सोडले होते. यानंतर 2 वाजता त्या घरातून बाहेर पडल्या. या दरम्यानचे सिसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे.