शाहू छत्रपती यांच्या भेटीनंतर राऊतांचा विरोधकांना दम
कोल्हापूर प्रतिनिधी
राज्यसभेच्या ( Rajyasabha ) सहाव्या जागेवरून अनेक नाट्यमय घडामोडी राज्यात घडतायेत. संजय राऊत (Sanjay Raut ) हे दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. काल श्रीमंत शाहू महाराज ( Shahu_Maharaj ) यांच्या गौप्य स्फोटानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी केलेलं ट्वीट आणि आज संजय राऊत यांनी शाहू महाराज यांची भेट घेतली. मात्र हि भेट राजकीय नसून, छत्रपती घराण्याचे वंशज आहेत ते त्यांचा आशिर्वाद घेऊन आम्ही काम करतो. उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thakre ) यांनी देखील मला निरोप दिला होता महाराजांची भेट घेऊन या यासाठी मी शाहू महाराजांची भेट घेतल्याच संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं.
तसेच, श्रीमंत शाहू महाराज यांना चुकीची स्क्रिपटेड माहिती दिली गेली असल्याचा आरोप भाजपने केला. मात्र छत्रपती घराण्याचा वारसा ते चालवत आहेत, फार जेष्ठ आहेत ते चुकीच्या माहितीच्या आधारे ते बोलणार नाहीत, चुकीची माहिती देऊन छत्रपती घराण्याचा अपमान विरोधकांनी करू नये असा टोलाही त्यांनी लगावला.