Tarun Bharat

जिह्यात 32 हजार 789 नावे दुबार


निवडणूक विभागाकडून वगळणीची कार्यवाही सुरु
कोल्हापूर दक्षिण’मध्ये सर्वाधिक सहा हजार 794 नाव

Advertisements

कोल्हापूर / प्रवीण देसाई

एकापेक्षा अनेक मतदारयादीमध्ये म्हणजे दुबार नाव असणाऱयांचा शोध घेऊन ते वगळण्याचे काम निवडणूक आयोगाकडून सुरु आहे. कोल्हापूर जिह्यात अशी 32 हजार 789 दुबार नावे आढळली आहेत. ही नावे वगळण्याची कार्यवाही जिल्हा निवडणूक विभागाकडून सुरु आहे. यामध्ये सर्वाधिक 6 हजार 794 इतकी नावे ही कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आहेत. त्याखालोखाल कोल्हापूर उत्तर, इचलकरंजी व शिरोळ मतदारसंघांचा समावेश आहे.

निवडणूक आयोगाकडून अशी दुबार नावे असणाऱयांचा शोध घेतला जात आहे.निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरमध्ये एकापेक्षा अनेक मतदारयादीमध्ये एक सारखे चेहऱयांची छायाचित्र असणाऱयांची नावे आढळली आहेत. याची गांभिर्याने दखल घेत निवडणूक आयोगाने अशी दुबार नावे वगळण्याची कार्यवाही सुरु केली आहे. ही नावे लाखेंच्या घरात आहेत. त्यानुसार मतदार पुनरिक्षण निरंतर कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर जिह्यातही अशा पध्दतीने जिल्हा निवडणूक विभागाने कार्यवाही सुरु केली आहे.

निवडणूक विभागाकडे एक सारखे चेहरा असणाऱयांची नावे एकापेक्षा अधिक मतदारयादीत आढळल्याचे 97 हजार 907 अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांची छाननी केल्यानंतर 32 हजार 789 इतक्या अर्जातील नावे ही दुबार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार ही नावे वगळण्याची कार्यवाही निवडणूक विभागाकडून सुरु आहे. यामध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 6 हजार 794 इतकी दुबार नावे आहेत. त्या खालोखाल इचलकरंजी मतदारसंघात 5 हजार 510, कोल्हापूर उत्तर मतदारसंघात 4 हजार 833, व शिरोळ मतदारसंघात 4 हजार 410 इतकी दुबार नावे आहेत. त्याचबरोबर निवडणूक विभागाला प्राप्त झालेल्या एकूण अर्जांपैकी 5 हजार 536 अर्ज हे पत्त्यासह इतर दुरुस्तीसाठी भरुन घेण्यात आले आहेत.

मतदार नोंदणीसाठी आता वर्षातून चारवेळा सुविधा

मतदार नोंदणा आता वर्षातून चार वेळा करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने केली आहे. यापूर्वी वर्षातून एकदा मतदार नोंदणी केली जायची. परंतु आता ही नोंदणी वर्षातून 4 वेळा म्हणजेच 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर रोजी करता येणार आहे.

1 ऑगस्टपासून मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडण्याची मोहीम सुरु

मतदारयाद्यांचे प्रमाणीकरण, दुबार नावे वगळणे यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्नग्न करण्याची विशेष मोहीम राज्यभर 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन याचे अर्ज भरुन घेणार आहेत.

जिह्यात आढळलेली दुबार नावे (विधानसभा मतदारसंघनिहाय)

विधानसभा मतदार संघ
दुबार नावे
कोल्हापूर दक्षिण 6794
इचलकरंजी 5510
कोल्हापूर उत्तर 4833
शिरोळ 4410
चंदगड 2026
राधानगरी 1158
कागल 1711
करवीर 1757
शाहुवाडी 1672
हातकणंगले 2918

Related Stories

मेगा भरती विरोधात मराठा क्रांतीचे आंदोलन तीव्र

Abhijeet Shinde

हातकणंगलेतील भादोलेत अलगीकरणात असलेली महिला कोरोना पॉझिटीव्ह

Abhijeet Shinde

ग्रामीण भागातील बसेसचा पुढील 10 दिवसांत निर्णय होणार

Archana Banage

दोन वर्षानंतर ‘दहीहंडी’चा थरार..!

Kalyani Amanagi

मुंबईत २५ जूनला मराठा आरक्षण गोलमेज परिषद

Abhijeet Shinde

राज्यात फायर ऑडीटसाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही – यड्रावकर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!