Tarun Bharat

तलाव ठेका रक्कम भरण्यास मे अखेरपर्यत मुदतवाढ

कोरोना काळातील दोन वर्षांची ठेका रक्कम माफीचा प्रस्ताव आणणार; मत्सव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची माहिती

Advertisements

कोल्हापूर प्रतिनिधी

कोरोना प्रादुर्भाव काळात आर्थिक झळ सहन कराव्या लागलेल्या राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने मासेमारीकरीता ठेक्याने देण्यात आलेल्या तलाव, जलाशयांची वार्षिक तलाव ठेका रक्कम भरणा करण्यासाठी 31 मे 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच 2021-22 तलाव ठेक्याची रक्कम माफ करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेसाठी ठेवण्यात येईल, अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्यावेळी राज्यात घोषित लॉकडाऊनमुळे राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना पूर्ण क्षमतेनुसार मासेमारी करता आली नाही, तसेच उत्पादित मासळीची विक्री करण्यास पुरेसा वाव न मिळाल्यामुळे मच्छीमारांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले असल्याचे मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्यातील मासेमारीकरीता ठेक्याने देण्यात आलेल्या तलाव आणि जलाशयांची चालू वर्ष सन 2021-22 ची वार्षिक तलाव ठेका रक्कम भरणा करण्यासाठी 31 मे 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.

राज्यातील ठेकेदार मच्छिमार संस्था कोरोनाच्या काळात अडचणीत आल्या होत्या. त्यामुळे तलाव ठेका रक्कम भरण्यास मुदतवाढ देण्याची आमची मागणी होती. मुदतवाढीने दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री शेख यांचे आभार. कोरोनाकाळातील ठेका रक्कम माफ व्हावे ही अपेक्षा आहे.
प्रा. एकनाथ काटकर, प्रदेश काँग्रेसचे माजी सचिव

Related Stories

कर्नाटक: संपूर्ण लॉकडाऊनवर विचार करण्याची गरज: केंद्रीय मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा

Archana Banage

तेलंगणातील लॉक डाऊन सात मे पर्यंत वाढवले

prashant_c

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग

Tousif Mujawar

ट्रम्प यांच्यावरील वादग्रस्त पुस्तकाच्या विक्रीला न्यायालयाची परवानगी

datta jadhav

अनैतिक संबंधातून झालेल्या खुनात दोघांना जन्मठेप

Archana Banage

ओबीसींचं राजकीय आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत निवडणुका नको: देवेंद्र फडणवीस

Archana Banage
error: Content is protected !!