पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर केले नागरिकांना आवाहन
कोल्हापूर प्रतिनिधी
जिह्यात गेल्या दोन दिवसापासून पडणाऱया मुसळधार पावसामुळे नदीपातळ्यांना झपाटय़ाने वाढ होत आहे. संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनातर्फे सर्व उपायोजना करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन माजी मंत्री, आमदार सतेज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.
अधिक वाचा– जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत रेड अलर्ट
भारतीय हवामान वेधशाळेने येणाऱया 4 दिवसात म्हणजेच 8 जुलै पर्यत कोकणसह कोल्हापूर जिह्यामध्ये मोठया प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूकरांना आवाहन करताना आमदार सतेज पाटील यांनी म्हटले आहे की, अतिवृष्टी सदृश पावसामुळे दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता असल्याने गरज असेल तरच घराबाहेर पडावे. पर्यटन स्थळी जाणे टाळावे, जिह्यात काही सखल व नदीकाठी असलेल्या भागांमध्ये पाणी वाढल्यास प्रशासनाला सहकार्य करून सुरक्षित स्थळी तत्काळ स्थलांतरित व्हावे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असेही पाटील यांनी म्हटले आहे.
पहा- Live : प्रयागचिखलीतुन आजच्या पावसाचा आढावा…. पहा लाईव्ह
“पूरपरिस्थितीत कोणतीही मदत हवी असल्यास तत्काळ माझ्यासह आमदार ऋतुराज पाटील, जयश्री जाधव किंवा अजिंक्यतारा कार्यालयाशी संपर्क करा” असे सतेज पाटील यांनी म्हटले आहे.
पूरपरिस्थितीत नागरिकांसाठी हेल्पलाईन
संपर्कासाठी मोबाईल नंबर ः सतेज (बंटी) पाटील ः 9823012905, आमदार ऋतुराज पाटील ः 9764495999, आमदार जयश्री जाधव ः 9552073100, अजिंक्यतारा कार्यालय ः 0231-2653288/89/90.