Tarun Bharat

महापुराच्या धास्तीने प्रयाग चिखलीकरांकडून जनावरांचे स्थलांतर सुरु

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

कोल्हापूर: गेली दोन दिवस कोल्हापुर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरुचं आहे. आतापर्यंत २७ बंधारे पाण्याखाली गेले असून, पंचगंगा नदी पात्राबाहेर आली आहे. कोल्हापुरात (Kolhapur) २०१९ च्या महापुरात प्रापंचिक साहित्याबरोबर अनेकांची जनावरे महापुरात वाहून गेली. या पार्श्वभूमीवर यागचिखलीमध्ये (Prayag Chikhali) पशुहानी होऊ नये, म्हणून जनावरं स्थलांतर करण्याला सुरवात केली आहे.२०१९ च्या महापुरात चिखली गावातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता.

आज कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र धरणक्षेत्रात जोर कायम आहे. राधानगरी धरणातून १२०० क्यूसेक इतका विसर्ग सुरु आहे. तर गगनबावड्यातील वेसरफ तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून, ५० क्यूसेक विसर्ग सुरु आहे. सुरक्षिततेसाठी कालच एनडीआरएफच्य़ा दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत.

Related Stories

उत्तरप्रदेशात झिका विषाणूचं थैमान; एकाच वेळी १४ नव्या रुग्णांचा समावेश

Archana Banage

करवीर तालुक्यात मुसळधार पावसामुळे महे -बीड पूल पाण्याखाली व सावरवाडी- शिरोली दरम्यान पाणी आल्याने मार्ग बंद

Archana Banage

शिरोळमध्ये पक्षीय कमी, गटातटाचे राजकारण अधिक

Kalyani Amanagi

मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळेच पोलिसांनी मला ताब्यात घेतलं ; संजय निरुपमांचा आरोप

Archana Banage

इचलकरंजी यंत्रमाग कारखान्यात शॉर्टसर्कीटनं आग; दोन कोटीचं नुकसान

Abhijeet Khandekar

मी सत्यच बोललो; संभाजीराजे आपल्या भूमिकेवर ठाम

Archana Banage