Tarun Bharat

ब्रेक निकामी झालेल्या शिवशाही बसची चार-ते पाच वाहनांना धडक

दोघे जखमी, गतीरोधकामुळे मोठा अपघात टळला

घुणकी प्रतिनिधी

पुणे-बंगळूर महामार्गावरील किणी (ता. हातकणंगले) पथकर नाक्यावर पथकर देण्यासाठी उभारलेल्या वाहनांवर ब्रेक निकामी झालेल्या शिवशाही बसची पाठीमागून धडक बसल्याने कारमधील दोघेजण जखमी झाले. ही घटना चारच्या सुमारास घडली.

घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी–पुण्याहून कोल्हापूरकडे प्रवाशांना घेऊन निघालेल्या शिवशाही बसचा (एम-एच-०७-सी ७१४६) किणी पथकर नाक्याजवळ आली असताना ब्रेक निकामी झाला. त्यामुळे पथकर देण्यासाठी उभारलेल्या वॅगनार मोटारगाडी (एम-एच-०३-सीजी २८१५) ला धडक दिली. त्यातील दोघेजण जखमी झाले. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची नावे समजू शकली नाहीत.

शिवशाहीने वॅगनारला धडक दिल्यानंतर हुंडाई मोटारगाडी (एम-एच-४६- बीक्यू १९०९), कार (एम.एच.०४-डी.जे. ७९७८)यासह अन्य दोन गाड्या एकमेकांना धडकल्या. या सर्व कारचे मोठे नुकसान झाले. दरम्यान पथकर नाक्या जवळील गतीरोधक व चालकाच्या प्रसंगावधानाने गाडीची गती कमी केल्याने मोठा अनर्थ टळला. सदर अपघाताची नोंद वडगांव पोलिसात झाली आहे.

Related Stories

PFI विरोधात पनवेलमध्ये मोठी कारवाई; सचिवासह दोन सदस्यांना घेतलं ताब्यात

Archana Banage

आजरा तालुक्यात आणखी ४ कोरोना बाधित

Archana Banage

Teachers Day Special: पंतप्रधानांची मोठी घोषणा; १४ हजार ५०० शाळा अपग्रेड होणार

Archana Banage

भारत बायोटेकची ‘नेसल’ लस येणार

Patil_p

भादोले गावात समूह संसर्गाची भीती, आत्तापर्यंत सापडले १५ रुग्ण

Archana Banage

CBSE दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक 2 फेब्रुवारीला जारी होणार : शिक्षणमंत्री

Tousif Mujawar