Tarun Bharat

Kolhapur; मंत्रालयाच्या नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

फरार तोतया लिपिकास मुंबई येथून अटक

वारणानगर / प्रतिनिधी

मंत्रालयात कनिष्ठ अभियंता पदावर नोकरी लावतो म्हणून दोन लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी सचिन सुभाष पाटील रा. जेऊर ता. पन्हाळा याला कोडोली पोलिसांनी मुंबई येथून अटक केली. कोडोली येथील निखिल पंडितराव कणसे हा युवक स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी घेऊन पास झाला होता. त्याला सचिन पाटील याने मंत्रालयातील आपल्या नियुक्तचे पत्राची बनावट प्रत दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर मंत्रालयात कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी लावतो म्हणून निखिल कणसेकडून दोन लाख रुपये घेतले. सदरची रक्कम निखिल कणसे यांनी बँक ऑफ इंडियाच्या खात्यावरून सचिन पाटील याला दिली होती. ही रक्कम मिळाल्यापासून आरोपी सचिन पाटील हा मुंबई येथे वेगवेगळ्या ठिकाणी जागा बदलून राहत होता.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर निखिल कणसे याने कोडोली पोलीस ठाण्यात दिनांक 23 मार्च रोजी फसवणुकीचा गुन्हा सचिन पाटील यांच्या विरोधात दाखल केला होता. कोडोली पोलीस त्याला शोधण्यासाठी वारंवार मुंबईला जात होते. सचिन हा राहण्याचे ठिकाण व संपर्क नंबर कायम बदलत असल्याने त्याला पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांच्या समोर उभे होते. शाहूवाडी उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक रवींद्र साळुंखे व कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल कुमार डिजिट यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार नरेंद्र पाटील पोलीस कॉन्स्टेबल कृष्णात पाटील होमगार्ड देसाई यांनी चार दिवसापासून मुंबई येथे सापळा लावला होता. त्याला आज यश आले फौजदार पाटील यांनी सचिनला शिफातीने पकडले. आज त्याला पन्हाळा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Related Stories

भाजपकडून महानगरपालिकेतील कचरा घोटाळ्य़ाचा भांडफोड

Abhijeet Khandekar

कसबा सांगाव येथे ३० एकरातील ऊस जळाला

Archana Banage

मुख्यमंत्री-पंतप्रधान भेटीवर रोहित पवारांनी केली खास पोस्ट, म्हणाले…

Archana Banage

फ्लाइंग सिख मिल्खा सिंग यांची प्रकृती पुन्हा बिघडली; ICU मध्ये दाखल

Tousif Mujawar

राहुल कनालचा दिशा सालियन मृत्यूप्रकरणाशी संबंध?

datta jadhav

वैद्यकीयची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया स्थगित करा

Archana Banage