Tarun Bharat

गडहिंग्लज कारखाना चालवण्यास देण्यास विरोध करणार

माजी चेअरमन श्रीपतराव शिंदे; जनता दलाच्या कार्यकर्त्यांची बैठक पार

प्रतिनिधी/गडहिंग्लज

2013 प्रमाणे गडहिंग्लज कारखाना पुन्हा एकदा कुणाच्या तरी घशात घालण्याचा डाव आखला आहे. हे षडयंत्र चालू देणार नसल्याचे सांगत गडहिंग्लज कारखाना कंपनीला चालवण्यास देण्यास जनता दलाचा तीव्र विरोध असेल असे प्रतिपादन कारखान्याचे माजी चेअरमन श्रीपतराव शिंदे यांनी रविवारी पार पडलेल्या जनता दलाच्या बैठकीत केले आहे. यासाठी 11 जूनला होणा-या विशेष सभेला सा-यांनी उपस्थित राहून हा कुटील डाव हानून पाडावा असे आवाहन ही केले.

वाढती महागाई, साखर कारखान्याची 11 जूनची सभा या अनुषंगाने जनता दलाची लक्ष्मी सेवा संस्थेत बैठक पार पडली. सुरूवातीस दत्ता मगदूम यांनी बैठकीचे आयोजन सांगितल्यानंतर माजी चेअरमन शिंदे यांनी विरोधकाचा जोरदार समाचार घेत खोटया विरूध्द जनता दलाच्या कार्यकर्त्यांत आहे असे सांगितले. कारखान्यावर बोलताना त्यांनी 24 कोटी 65 लाख वसुलीला आपण न्यायालायातून स्थगिती घेतल्याचे सांगितले. कारखाना कंपनीने सोडल्यानंतर चालविण्याचा प्रयत्न केल्याचे सांगत कारखाना बंद पडावा यासाठीच संचालकांनी राजीनामा दिल्याचा जोरकस आरोप केला.

कारखाना बंद पाडणारेच नव्या कंपनीच्या शोधात असून पुन्हा कारखाना दुस-याच्या घशात घालण्याचा डाव सुरू असून त्याच्या विरोधात सा-यांनी एकवटले पाहिजे. 11 जूनला सर्व सभासदांनी जमून कारखाना चालवण्यास देण्याच्या ठरावाला विरोध केला पाहिजे असे माजी चेअरमन श्रीपतराव शिंदे यांनी स्पष्ट केले. कारखाना कोणत्याही परिस्थिती शेतकरी सभासदांचा राहिला पाहिजे. यासाठी सा-यांनी एकत्र यावे असे आवाहन केले. माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी पालिकेत सत्तेवर आल्यावर पहिला ठराव विधवा प्रथा बंदीचा करणार असल्याचे सांगत कारखान्यावर कमी कर्ज असताना ही कर्ज मिळत नाहीत हे दुर्देव आहे. कारखान्यावर प्रशासक आणण्याचा कुटील डाव यशस्वी झाल्यानंतर आता कंपनीच्या घशात घालण्याचा प्रयत्न हानून पाडला पाहिजे असे आवाहन केले. यावेळी हिंदुराव नौकुडकर, माजी नगराध्यक्ष बापूसाहेब म्हेत्री, आण्णासाहेब अत्याळे यांनीही मनोगते व्यक्त केले. विश्वनाथ खवणेकर यांनी आभार मानले. बैठकीला उदय कदम, रमेश मगदूम, बाळासाहेब मोरे, श्रीपती कदम, प्रकाश मंत्री, भिमराव पाटील, प्रकाश म्हेत्री, शशिकांत चोथे, अनिल देवेकर यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

उणे नेटवर्कचा प्रयत्न
गडहिंग्लज कारखाना उणे नेटवर्कमध्ये आल्यानंतर गतवर्षी कोणत्याच संस्थेने कर्ज पुरवठयासाठी मदत केली नाही. सेवानिवृत्त कामगारांच्या देय रक्कमेसाठी आपण त्यांच्याबरोबर असल्याचे सांगत या कामगारांची देय रक्कम ताळेबंदात समाविष्ट केल्यानंतर कारखान्याचे उणे नेटवर्क आणखी वाढणार आहे. त्यामुळे कर्ज मिळण्यात अडचणी येण्याची भिती असल्याचे सांगत माजी चेअरमन शिंदे यांनी उणे नेटवर्कमुळे कारखाना चालवण्यास देणे याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती निर्माण केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Related Stories

कोल्हापूर : गगनबावड्यातील माळरान रानफुलांनी बहरलं

Archana Banage

कोल्हापुरात पर्यटक आणि भाविकांना फटका; रणरणत्या उन्हात बोचणाऱ्या खडीतून दर्शनासाठी पायापीठ

Archana Banage

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्तीच्या हालचाली

Archana Banage

सेनापती कापशीतील खासगी तरुण डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू

Archana Banage

पेठ वडगाव शेती उत्पन्न बाजार समिती प्रशासकपदी उपनिबंधक प्रदीप मालगावे

Archana Banage

वीज बिलात सवलत द्यावी, अन्यथा रस्त्यावरची लढाई

Archana Banage