Tarun Bharat

कोल्हापूरच्या पुणेकर नातीची ‘शंभर नंबरी’ कामगिरी

दहावीच्या परीक्षेत 100 टक्के गुण : ईशा सजगुरे नेत्रदीपक यश : भविष्यात आई, वडिलांप्रमाणे डॉक्टर होण्याचे स्वप्न

Advertisements

कोल्हापूर प्रतिनिधी

कोल्हापूरच्या पुणेकर नातीने दहावीच्या परीक्षेत चक्क शंभर टक्के गुण मिळवत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. ईशा सजगुरे असे या नातीचे अर्थात विद्यार्थिंनीचे नाव आहे. तिने संगीताच्या गुणांसह 500 पैकी 500 गुण मिळवून आगळा वेगळा विक्रम केला आहे. आई वडील डॉक्टर असणाऱ्या ईशालाही डॉक्टरच व्हायचे आहे. त्याची तयारी तिने दहावीचा निकाल लागण्याआधीपासूनच सुरू केली आहे.

ईशा सजगुरे ही कोल्हापूरच्या पूर्वाश्रमीच्या वासंती कुलकर्णी यांची कन्या. शिवाजी पेठेतील साकोली कॉर्नर जवळ कुलकर्णी यांचे घर. मुकुंद कुलकर्णी आणि सौ. विजया कुलकर्णी यांची मुलगी वासंती भक्तीसेवा विद्यापीठ हायस्कूलची विद्यार्थिंनी. वासंतीने सोलापूरच्या व्ही. एम. मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतले. अमेरिकेतील डॅलसमध्ये मृत्रपिंडविकार अर्थात नेफ्रॉलॉजी विषयात पदव्युतर फेलोशिप केली. वासंती यांचे पती डॉ. अतुल सजगुरे हे देखील नेफ्रॉलॉजी तज्ञ आहेत. या दोघांचे पुण्यात एरंडवणा येथे जनाई क्लिनिक आहे. डॉक्टर दाम्पत्याची कन्या असणाऱया ईशाचा भाऊ अमेय हा देखील पुण्यातील बीजे मेडिकलमध्ये एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाला आहे. आई वडील आणि भावाप्रमाणे डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगलेल्या ईशाने दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवून आपल्या आई वडिलांचा विश्वास सार्थ ठरविलाच पण डॉक्टर होण्याच्या दृष्टीने पुढे एनईईटीच्या तयारीला देखील लागली आहे.

पुण्यातील अभिवन इंग्रजी माध्यमाच्या शाळेची विद्यार्थिंनी असणाऱया ईशाला दहावीच्या परीक्षेत इंग्रजीला 92, हिंदीला 96, मराठीला 96, गणितला 97, विज्ञान आणि तंत्रज्ञानाला 98 आणि समाजशास्त्राला 99 गुण असे एकूण सहा विषयात 600 पैकी 578 गुण मिळाले. बेस्ट फाईव्हमध्ये ईशाच्या पाच सर्वोत्तम गुण असणाऱ्या विषयाची एकूण बेरीज 500 पैकी 486 गुण इतकी झाली. त्यामध्ये ईशाला गायन, संगीताचे 14 गुण मिळाले. त्यामुळे तिच्या गुणांची बेरीज 500 झाली. 500 पैकी 500 गुण संपादन करण्याचा पराक्रम तिच्या नावावर नोंदला गेला. पुणे बोर्डात कोल्हापूरच्या नातीने झेंडा फडकविला. शास्त्राrय संगीत आणि कथ्थक नृत्याची आवड असणाऱ्या ईशाने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या शास्त्राrय संगीताच्या पाच परीक्षा आणि कथ्थकच्या तीन परीक्षांत यश मिळवले आहे. शास्त्राrय संगीत, नृत्याचा छंद जपत आता ईशा आई, वडिल, भावांप्रमाणे डॉक्टर होणार आहे. त्यासाठी तिची तयारही सुरू झाली आहे.

Related Stories

कोल्हापुरात हजारो परप्रांतीय मजूर रस्त्यावर

Abhijeet Shinde

मनपा सप्टेंबर, तर झेडपी निवडणूक ऑक्टोबरमध्ये घ्या! ‘रानिआ’ची सुप्रीम कोर्टाला विनंती

Rahul Gadkar

` ‘राजारामकाळात’ करवीर संस्थानमध्ये आधुनिक शिक्षणाचा पाया

Sumit Tambekar

रेमडीसिव्हीयरचा काळाबाजार तात्काळ थांबवावा : समरजितसिंह घाटगे

Abhijeet Shinde

जवान विनय भोजे यांच्यावर तिळवणी येथे अंत्यसंस्कार

Sumit Tambekar

आम्ही छत्रपती शिवरायांचे वारस, विसरू नका !

Abhijeet Shinde
error: Content is protected !!