Tarun Bharat

सेंद्रिय खत निर्मिती क्षेत्रात ‘गोकुळ’चे पाऊल

Advertisements

अध्यक्ष विश्वास पाटील यांची माहिती : गडमुडशिंगी येथे राज्यातील पहिल्या स्लरी प्रकल्पाचे उद्या उद्घाटन

प्रतिनिधी/कोल्हापूर

गोकुळने सेंद्रीय खत निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले आहे. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, आणंद आणि सस्टेन प्लस एनर्जी फौंडेशन (टाटा ट्रस्ट) यांच्या सहकार्यातून संघाच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी येथे राज्यातील पहिला स्लरी प्रकीया प्रकल्प उभारण्यात आला आहे. सोमवार 8 रोजी सकाळी 11 वाजत मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. स्लरी प्रकल्पामधून फॉस्फ-प्रो, रुट गार्ड, ग्रोमॅक्स, मायक्रो न्युट्रीयंट आदी सेंद्रीय खतांची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली.

बायोगॅस प्लांट व स्लरी प्रक्रीया प्रकल्पासाठी सस्टेन प्लस एनर्जी फौंडेशनकडुन 49 लाख 65 हजार आणि एनडीडीबीकडून 43 लाख असे एकूण 92 लाख 65 हजार रुपये अर्थसहाय्य मिळाले आहे. तसेच सस्टेन प्लस एनर्जी फौंडेशनकडून चुये, बाचणी, इस्पुर्ली, खेबवडे, वडकशिवाले आदी गावांमधील 120 महिला दूध उत्पादकांना फ्लेक्सी बायोगॅस प्लांट देण्यात आले आहेत. प्लाटंच्या माध्यमातून संबंधित महिला दूध उत्पादकांना घरगुती वापरासाठी गॅस मिळणार आहे. यामुळे सिंलेंडरवर महिन्याकाठी होणारा 2 हजार रुपये खर्च वाचणार आहे. तसेच बायोगॅसमधून प्रतिदिन अंदाजे 80 ते 100 लीटर स्लरी मिळणार आहे. हि स्लरी शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. शेतीसाठी वापर करुन उरलेली स्लरी गोकुळ खरेदी करणार आहे. गुणवत्तेनुसार स्लरीचे शेतकऱयांना 25 पैसे ते दोन रुपये प्रतिलिटरनुसार दर दिला जाईल. प्रतिदिन 50 लिटर स्लरीचे महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. बायोगॅस प्लांटच्या माध्यमातून संबंधित शेतकऱयाला महिन्याकाठी एकूण 3500 रुपये मिळणार आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱयांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनविण्याचा प्रयत्न गोकुळचा आहे, असे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

स्लरी प्रक्रीया प्रकल्प हा 5 टन क्षमतेचा आहे. येथे प्रक्रीया केल्या जाणाऱया स्लरीपासुन फॉस्फ-प्रो या फॉस्फरसयुक्त सेंद्रीय खताची निर्मिती केली जाणार आहे. हे खत डीएपीसाठी उत्तम पर्याय असुन किमान दोनशे रुपयांची बचत होणार आहे. द्रवरुप स्लरीमध्ये सुक्ष्मपोषके, खनिजे व जीवनसत्त्वे मिसळून ग्रोमॅक्स आणि एमआरएल हे खत पिकांवर फवारणी करण्यासाठी बनविले जाणार आहे. तसेच रुटगार्ड हे उत्पादन रोपांची मुळे भिजवून लागवड करण्यासाठी वापरता येणार आहे. हि सर्व उत्पादने एनडीडीबी ट्रेडमार्क ‘सुधन’ या नावाने बनवली जाणार असल्याची माहिती गोकुळचे अभियांत्रिकी व्यवस्थापक प्रताप पडवळ यांनी दिली.

खतांची विविध पिकांवर चाचणी
गोकुळकडुन बनविल्या जाणाऱया सेंद्रीय खत उत्पादनांची एनडीडीबी आणि आनंद ऍग्रीकल्चर युनिवर्सिटी मार्फेत वेगवेगळय़ा पिकांवर चाचणी घेण्यात आली आहे. त्याचे परिणाम अत्यंत चांगले दिसून आले आहेत. या खतांच्या वापराने जमिनीचा पोत सुधारुन पिकांची चांगल्या प्रकारे वाढ होण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्वास अध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Related Stories

कोल्हापूर : वारणा महाविद्यालयात दक्षता जनजागृती सप्ताहाची सुरूवात

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात आज कोरोनाने 11 जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

जिल्हय़ात 24 तासांत 34 कोरोना बळी

Abhijeet Shinde

कोल्हापूर : सावर्डे बुद्रुक खून प्रकरण; आरोपीला फाशी द्या

Abhijeet Shinde

कारागृहात स्पीड पोस्टमधून गांजा

Kalyani Amanagi

छ. राजाराम सहकारी साखर कारखाना एकरकमी एफ.आर.पी. देणार !

Abhijeet Shinde
error: Content is protected !!