Tarun Bharat

शाहू स्मृतीशताब्दी निमित्त ग्रामिण भागासह संपुर्ण जिल्ह्यात अभिवादन

कोल्हापूर प्रतिनिधी

जयसिंगपूर

शहराचे संस्थापक लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञतापर्व निमित्य येथिल क्रांती चौकात १००सेकंद स्तब्धता पाळुन अभिवादन व आदरांजली वाहण्यासाठी परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक समाजसेवी संस्थांचे पदाधिकारी शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याधिकारी तैमूर मुल्लानी यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.

कागल येथिल शाहू करखान्यात छत्रपती शाहू महाराजांना आदरांजली

श्री.छत्रपती शाहू महाराज यांच्या १०० व्या स्मृतिदिननिमित्त श्री.छत्रपती शाहू साखर कारखान्याचे प्रधान कार्यालय श्रीमंत जयसिंगराव घाटगे भवन समोर असणाऱ्या श्री छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर १०० सेकंद संत स्तब्धता पाळून श्री शाहू ग्रुपच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शाहू ग्रुपचे प्रमुख राजे समरजितसिंह घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

राधानगरी येथे छ. शाहू महाराज शासकीय कार्यालये यांच्यावतीने आदरांजली

रयतेचे राजे छ, शाहू महाराज यांच्या स्मूर्ती शताब्दी कृज्ञादता पर्वानिमित्ताने राज्यांची कर्मभूमी असलेल्या राधानगरी येथे छ. शाहू महाराज यांच्या पुतळ्यानजीक शेकडो शाहू प्रेमी जनतेच्या व ग्रामपंचायतच्या वतीने 100 सेकंद स्तब्ध राहून आदरांजली वाहिली. तसेच तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, वनविभाग, पोलीस ठाणे, महसूल, व्यापारी संघटना, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, सर्व संस्थेचे पदाधिकारी शालेय विद्यार्थी, शिक्षक इतर संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी छ, शाहू महाराज यांना आदरांजली वाहिली.

शिरोळ परिसरात छत्रपती शाहू महाराजांना आदरांजली

शाहू स्मृतिदिननिमित्त शिरोळ व परिसरात आदरांजली वाहण्यात आली. येथील पद्माराजे विद्यालयाच्या क्रीडांगणावर  बरोबर दहा वाजता  १०० सेकंद  स्तब्धता पाळून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ नगराध्यक्ष अमरसिंह पाटील उपनगराध्यक्ष तातोबा पाटील विद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य सर्व नगरसेवक शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पेठ वडगाव

पेठ वडगाव शहरात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना शंभर सेकंद स्तब्धता पाळून आदरांजली वाहण्यात आली. या उपक्रमास पेठ वडगाव शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरात व्यापारी, व्यावसाईक, नागरीक यांनी उत्स्फूर्तपणे स्तब्धता पाळून आदरांजली वाहिली. शहरातील विविध प्रभागामध्येही नागरिकांनी दारात स्तब्धता पाळून आदरांजली वाहिली.

राजर्षी शाहूंना कबनूरकरांच्या वतीने अभिवादन

लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञतापर्व निमित्य येथिल मुख्य चौकात १००सेकंद स्तब्धता पाळुन अभिवादन व आदरांजली वाहण्यासाठी परिसरातून नागरिक समाजसेवी संस्थांचे पदाधिकारी शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी कोल्हापूर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या सूचनेनुसार छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कार्यास मानवंदना देण्यासाठी शुक्रवारी सहा मे रोजी दहा वाजता 100 सेकंदासाठी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून त्यांना मानवंदना दिली.

कष्टकरी शेतकरी महीलांकडून लोकराजाला अभिवादन…!

कसबा बीड

लोकराजा शाहू महाराजांनी दिलेल्या समतेच्या शिकवणीमुळे कोल्हापुरात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गविंदाने राहत आहेत. आपल्या सर्वांचे जीवन समृद्ध करणाऱ्या लोकराजाला त्याच्या स्मृती शताब्दी निमित्त अभिवादन करण्यासाठी संपूर्ण कोल्हापूर जिल्हा सरसावला आहे. यामध्ये कसबा बीड भागातील पाडळी खुर्द, कोगे, कसबा बीड, शिरोली दुमाला, चाफोडी या भागातील सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी सर्व संस्थांचे पदाधिकारी तसेच युवक व ग्रामस्थ यांच्या वतीने लोकराजा शाहू महाराजांना सकाळी दहा वाजता शंभर सेकंद स्तब्ध उभे राहून अभिवादन करण्यात आले.

शाहुवाडी

लोकराजा जनतेचे कैवारी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमात अंतर्गत शंभर सेकंद थांबून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी तहसीलदार कार्यालय शाहूवाडी, पंचायत समिती शाहूवाडी, शाहुवाडी पोलीस स्टेशन’, वनविभाग, मलकापूर ग्रामीण रुग्णालय, मलकापूर नगरपरिषद मलकापूर बाजार पेठ आदीसह संपूर्ण शाहूवाडी तालुक्यात शासकीय कार्यालय व सर्व जनतेने आहे त्या ठिकाणी उभे राहून रयतेच्या जाणत्या राजाला आदरांजली वाहिली आणि संपूर्ण  शाहुवाडी तालुका शंभर सेंकद स्तब्ध राहीला

Related Stories

भारतीय लष्कराने ‘लष्कर ए तोयबा’च्या सहा दहशतवाद्यांचा केला खात्मा

Archana Banage

शिरोळ तालुका पूरग्रस्तांसाठी कायमस्वरूपी तोडगा काढणार – ना. राजेंद्र यड्रावकर

Archana Banage

Kolhapur : चित्रनगरीला गतवैभव येणार; राज्य सरकारकडून 17 कोटीचा निधी मंजूर

Abhijeet Khandekar

मुंब्रा येथील प्राइम रुग्णालयाला भीषण आग; 4 जणांचा मृत्यू

Tousif Mujawar

‘कृषी’च्या वैयक्तिक लाभ योजनेचे अनुदान जमा

Archana Banage

पूर व्यवस्थापनाचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करा

Archana Banage