Tarun Bharat

मुन्ना खासदार झाल्याचा आनंद : राजू शेट्टी

Advertisements

कोल्हापूर प्रतिनिधी

भाजपचे नवनिर्वाचित राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी चक्क रस्त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नमस्कार करून आशीर्वाद घेतले. कराड येथे पुणे- बेंगलोर महामार्गांवर हा प्रकार पहायला मिळाला.

कराड येथील पंकज हॉटेल येथे कोल्हापूरकडे निघालेले नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर कार्यकर्त्यांना भेटून बाहेर पडत असताना, तेथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे हॉटेलमध्ये निघाले होते. यावेळी पुणे- बेंगलोर महामार्गावर ती राजू शेट्टी हे गाडीतुन खाली उतरताच धनंजय महाडिक हे आपल्या गाडीतून तात्काळ खाली उतरत राजू शेट्टी यांच्या पाया पडले आणि आशीर्वाद घेतला.

धनंजय महाडिक खासदार झाल्याचा आनंद : राजू शेट्टी
यावेळी राजू शेट्टी म्हणाले, राज्यसभा निवडणुकीत आमच्या जवळचा व जिल्ह्यातला उमेदवार निवडून आल्याने आनंद आहे. धनंजय हे आमचे मित्र आहेत. सध्या आम्ही भाजप आणि महाविकास आघाडी या दोघांपासून लांब आहोत, स्वतंत्र आहोत. त्यामुळे एका मित्राचा विजय झाल्याने आनंद होत आहे.

error: Content is protected !!