कसबा बीड / प्रतिनिधी
मळणी यंत्रात भात लोटत असतांना एका शेतमजुराचा यंत्रात हात अडकून तो गंभीर जखमी झाला. ही घटना कोगे ( ता. करवीर ) येथे घडली.
जखमी शेतमजुराचे नाव परशराम गंगाराम पाटील आहे.कोगे येथे ढेंग्याच्या शिवारात भात मळणीच्या मशीनवर काम सुरू होते. त्या ठिकाणी परशराम पाटील मळणी यंत्रावर भात लोटत होते. मात्र अचानक त्याचा उजवा हात मळणी यंत्रात गेल्याने तो ओढला गेला, यंत्रात उजवा हात सापडणून जखमी झाले. यामध्ये मनगटापासून हाताचा बोटाकडील भाग तुटल्यामुळे रक्ताचा सडा पडला होता. ताबडतोब शेतकऱ्यांनी उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले.