Tarun Bharat

हातकणंगलेतील प्रभाग रचनेला उच्च न्यायालयात आव्हान

आमदार प्रकाश आवाडे, माजी जि.प.सदस्य अरुण इंगवलेंनी दाखल केली याचिका

Advertisements

कोल्हापूर प्रतिनिधी

हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रारुप प्रभाग रचनेच्या विरोधात आमदार प्रकाश आवाडे यांनी विभागीय आयुक्तांकडे हरकत दाखल केली होती. पण ही हरकत फेटाळल्यामुळे आमदार प्रकाश आवाडे व माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यामध्ये विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार यांना प्रतिवादी केले आहे. प्रसंगी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची आमदार आवाडे यांनी तयारी ठेवली आहे.

हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद गट व गणाची प्रारुप प्रभाग रचना चुकीची आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोग, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना रीतसर पुराव्यासहित निवेदने देऊन यामध्ये दुरुस्ती करावी असे सुचवले होते. आवाडे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा परिषद गट करण्याची दक्षता घ्यावी, असे निवडणूक आयोगाने आदेश दिले होते. पण याबाबत कोणतीही कार्यवाही न करता जुनीच सदोष प्रारुप प्रभाग रचना अंतिम केली असल्याचा आवाडे व इंगवले यांचा आरोप आहे.

चुकीची प्रभाग रचना रद्द करा
आमदार आवाडे यांच्या तक्रारीनुसार प्रभाग रचना करताना भौगोलिक संलग्नग्नता, दळणवळणाचे रस्ते ,डोंगर, व राज्य निवडणूक आयोगाचे दिशादर्शक, याचे पालन केलेले नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी वेगवेगळे दाखले व नकाशे देऊन काही मतदारसंघांमध्ये दळणवळणासाठी रस्ते उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही चुकीची प्रारुप रचना अंतिम केल्यामुळे याविरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल करून चुकीची प्रभाग रचना रद्द करण्याची याचिकेद्वारे मागणी केली आहे. यामध्ये हेरले जि.प. गटाच्या प्रभाग रचनेचा मुद्दा केंद्रीत केला आहे. पण न्यायालयाने जर हेरले जि.प.गटाची प्रभाग रचना चुकीची ठरवली तर पूर्ण तालुक्यातील जि.प.गटांची प्रभाग रचना नव्याने नरावी लागणार आहे.

Related Stories

सोमवारपासून सरसकट दुकाने उघडणारच

Abhijeet Shinde

सेनापती कापशी परिसरात टस्करचा धुमाकूळ

Abhijeet Shinde

म्हैस दुध खरेदी-विक्री दरात 2 रुपयांनी वाढ

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : कबनुरातील नामवंत डॉक्टर पॉझिटिव्ह ; २५० जण संपर्कात

Abhijeet Shinde

कोल्हापूर : बेकायदेशीर पानमसाला विक्री करणाऱ्या एकास अटक

Abhijeet Shinde

कुंभोजमधील एका नागरिकानेच केला स्वखर्चातून रस्ता

Abhijeet Shinde
error: Content is protected !!