Tarun Bharat

विधवा महिलांच्या सन्मानासाठी हेरवाड ग्रामपंचायतीने उचलले पाऊल..!

हेरवाडच्या ग्रामसभेत विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव संमत…

रवींद्र केसरकर कुरुंदवाड

महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या अनिष्ट प्रथेवर म्हणजे पतीच्या निधनानंतर विधवा समजून तिची आभूषणे काढणे, कुंकू पुसणे यांसह अन्य प्रकारे छळ करण्याची प्रथा बंद करण्यासाठी हेरवाड ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला असून याबाबतचा ठराव हेरवाडच्या ग्रामसभेत संमत करण्यात आला आहे. विधवा महिलांच्या सन्मानासाठी हेरवाड ग्रामपंचायतीने उचलेले पाऊल हे खरोखर कौतुकास्पद आहे.

विधवा महिलांच्या प्रश्नावर पूर्वी पासून अनेकांनी खूपच चांगले काम केले आहे. फुले शाहू आंबेडकर यांच्या कामाला तोडच नाही. डॉ नरेंद दाभोलकर व त्यांच्या टीममुळे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात आला. विधवा महिलांच्या पुणरविवाह, आरोग्य, आर्थिक, मुलांचे शिक्षण, अलीकडे कोरोना मुळे झालेल्या विधवा महिला यांचा प्रश्न दुर्लक्षीत राहिला आहे. पतीच्या निधनानंतर पत्नीच्या कपाळावरचा कुंकू यांसह, मंगळसूत्र तोडणे. बांगड्या फोडणे , पायातील जोडवी काढणे व काही ठिकाणी हे साहित्य पतीच्या अंत्यसंस्कारावेळी त्या अग्नीमध्ये टाकणे हा प्रकार तिच्या इच्छा विरोधी आहे. तसेच मरेपर्यंत तिला सर्व प्रकारच्या कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. सतीची प्रथा बंद झाली त्या पध्दतीने ही विधवा प्रथा बंद करण्यासाठी कायदा व्हायला पाहिजे किंवा अस्तित्वात असलेल्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याची गरज आहे. या अनेक वर्षांपासून आलेल्या अनिष्ट प्रथेला कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी हा विधवा महिला सन्मान व संरक्षण कायदा अभियान माध्यमातून प्रमोद झिंजाडे हे काम करीत आहेत. राबविण्यात येत आहे.

शिरोळ तालुक्यातील हेरवाड गावात ग्रामसभेत विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव मंजूर केला आहे ही महाराष्ट्र राज्यातील विधवा प्रथा बंद करणारी दुसरी ग्रामपंचायत आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतीला दिशादर्शक असून हे चळवळीचे लोण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात पसरणार आहे. लवकरच शिरोळ तालुक्यातील सर्व सरपंचांची या विषयावर कार्यशाळा आयोजित करून संपूर्ण शिरोळ तालुका विधवा प्रथामुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
प्रमोद झिंजाडे , करमाळा

समन्वयक राज्य विधवा महिला सन्मान व संरक्षण कायदा अभियान प्रमोद हिंजवडी यांनी सोशल मीडियावर विधवा प्रथा बंद विषय चाललेल्या समाजात जागृती अभियाना अंतर्गत आम्ही सध्या सुरू असलेल्या लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षाचे औचित्य साधून ग्रामसभेत विधवा कथा बंद करण्याचा एकमुखी ठराव सर्व सदस्य लोकप्रतिनिधी ग्रामस्थ यांच्या अनुमतीने घेतला असून इतर ग्रामपंचायतींनी पुढकार घ्यावा विधवा महिलांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांना त्यांचे हक्क देण्यासाठी ही प्रथा बंद करण्याची गरज आहे. या अभियानासाठी शिरोळ तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनी सदर ठराव संमत करून शासनाकडे पाठवावा
सुरगोंडा पाटील, सरपंच, हेरवाड

विधवा महिलांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी रूढी परंपरा निघालं दिलेल्या अनिष्ट प्रथा बंद झाल्या पाहिजेत या उद्देशाने हेरवाड ग्रामपंचायतीने प्रमोद झिंजाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसभेत विधवा प्रथा बंद एकमुखी ठराव करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे याचा एक महिला म्हणून सार्थ अभिमान आहे हा निर्णय सर्व ग्रामपंचायतीने एकमुखी ठराव करून घेतल्यास विधवा महिलांना सन्मानाने जगता येईल.

राणी माने - महिला सामाजिक कार्यकर्ते हेरवाड

Related Stories

नवजात ५ दिवसीय बालकाला जीवनदान

Anuja Kudatarkar

कुपवाडला “महापौर आपल्या दारी” उपक्रमात तक्रारींचा पाऊस

Abhijeet Khandekar

महापालिका क्षेत्रातील सर्व आरक्षीत भूखंड ताब्यात घ्या

Archana Banage

देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण

Archana Banage

मंगळूर येथे ब्लॅक फंगसच्या भीतीने दाम्पत्याची आत्महत्या, मात्र शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर

Archana Banage

अभियांत्रिकी सीईटीची नोंदणी पुन्हा सुरू करा

Archana Banage