Tarun Bharat

ऐतिहासिक माणगाव परिषदेचा शताब्दी समारोप मोठ्या उत्साहात पार

अमर पांडे संपादित “क्रांतीचे साक्षीदार” पुस्तकाचे प्रकाशन

सांगली : प्रतिनिधी

माणगांव येथे ऐतिहासिक माणगांव परिषदेचा शताब्दी समारोप मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. अमर पांडे यांनी संपादित केलेल्या ‘क्रांतीचे साक्षीदार’ या पुस्तकाचे प्रकाशन श्रीमंत छ.शाहू महाराज, ॲड. प्रकाश आंबेडकर व डॉ. बाबासाहेबांच्या नातसून प्रा. अंजलीताई आंबेडकर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

 पुस्तकामध्ये सन १९२० मध्ये माणगांव परिषद आयोजित करण्यात ज्यांचा मोठा वाटा होता, ते आप्पासाहेब पाटील यांच्यावर व त्यांच्या समाजकार्यावर आधारित लेख आहेत. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षि शाहू महाराज यांची परिषदेतील भाषणे व ठरावांचा उहापोह यामध्ये करण्यात आला आहे. आप्पासाहेब पाटील हे सत्यशोधकी विचाराचे तसेच दानशूर व्यक्तीमत्व होते. हत्ती सहज फिरु शकतील एवढा मोठ्ठा त्यांचा वाडा होता. त्यांचे अस्पृशोद्धाराचे कार्य व परिषदेतील सहभाग गावकऱ्यांना सहन झाला नाही, गावाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला. स्वतःच्या घरातही त्यांना कुणी घेईना. शेवटी त्यातच आजारी पडून त्यांचा मृत्यू झाला. शाहूराजे व बाबासाहेब असते तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. सन १९२२ ला शाहू महाराजांचे निधन झाले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लंडन मध्ये शिक्षण घेण्यासाठी गेले होते.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर 300 वर्षपूर्वीचे पिंपळाचे झाड असून, त्या झाडा शेजारीच ही परिषद संपन्न झाली होती. आप्पासाहेब पाटील हे या प्रसंगी उपस्थित होते. त्यामुळे वृक्ष, तसेच आप्पासाहेब पाटील हे माणगांव परिषदेच्या क्रांतीचे साक्षीदार ठरतात, असे संपादकाचे मत आहे. हे पुस्तक प्रा. डॉ. नितीन गायकवाड यांनी प्रकाशित केले असून, पुस्तकासाठी माजी महापौर सुरेश पाटील, प्रा रवी ढाले, प्रा आप्पासाहेब केंगार, डॉ. भगवान मींचेकर यांचे सहकार्य लाभले आहे.

Related Stories

कोल्हापुरात लस आली रे..!

Archana Banage

अपुऱ्या कामामुळे निकमवाडी येथील रस्ता बनला धोकादायक

Archana Banage

संभाजीराजे शिवबंधन बांधायला उद्या दुपारी मातोश्रीवर या, उद्धव ठाकरेंचा निरोप

datta jadhav

सांगली : कोविड उपचारासाठी अतिरिक्त वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात

Archana Banage

वास्तवाचं भान नसलेला अर्थसंकल्प- अजित पवार

Archana Banage

रेव्याचीवाडी येथे शेतीपिकांचे नुकसान

Archana Banage