राधानगरी / प्रतिनिधी
राधानगरी वन्यजीव अभयारण्य क्षेत्रात भेकर या प्राण्यांच्या शिकारीचे मटणाचे वाटे घालताना सावर्धन ता, राधानगरी येथील तिघाजणांना रंगेहाथ पकडून वन्यजीव कायद्या अंतर्गत कारवाई केली आहे.
या बाबत वन्यजीव विभागाकडून माहिती अशी की, सावर्धन, ता, राधानगरी येथील हडक्याचा या स्थानिक नावाने ओळखण्या जाणाऱ्या ठिकाणी भेकर या वन्य प्राण्यांची शिकार करून त्याच्या मांसाचे तुकडे करून त्याचे वाटे घालत असताना कोंडीबा डवर, राजेंद्र पाटील, ओंकार पताडे रा, सर्व सावर्धन या तिघांना वन्यजीव विभागाने ताब्यात घेतले आहे, या तिघांना वन्यजीव संरक्षक अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे, ही कारवाई वनक्षेत्रपाल सुहास पाटील, वनपाल एस व्ही कांबळे, वनरक्षक ए डी कुंभार, एम आर वंजारे वनमजुर बाळू राठोड मारुती पाटील यांनी ही कारवाई केली
सदरची कारवाई झाली असली तरी शिकार्याकडून अनेक ठिकाणी वन्य प्राण्यांच्या शिकारी होत आहेत व मांसाचे परस्पर विल्हेवाट लावली जात आहे यावरून स्पष्ट होते, त्यामुळे अभयारण्य क्षेत्रातील वन्यप्रान्याचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे, या कडे वन्यजीव विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी वन्यजीव प्रेमी व स्थानिक नागरिकांकडून होत आहे