Tarun Bharat

Kolhapur; कुख्यात इराणी हिसडा गँगच्या म्होरक्यासह चौघे अटकेत

महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा राज्यात गँगचा धुमाकूळ; गँगकडून तीन गुन्ह्यातील ४० ग्रॅमचे दागिने जप्त

इचलकरंजी प्रतिनिधी

शहरातील शिवाजीनगर पोलिसांनी कुख्यात इराणी हिसडा गँगच्या म्होरक्यासह चौघांना अटक केली. गँगचा प्रमुख अब्बास असलम झैदी ( वय ३१, रा. भोजे लोहगाव, जि. पुणे ) त्याचे साथिदार शरीफ शहा समरेश शहा ( वय २६, मनमाड, ता. नादगाव, जि. नाशिक), रफिक कासीमभाई मदारी ( वय ३५, रा. तामसवाडी, जि. जळगाव ), राजेश रामविलास सोनार ( वय ३६, रा. कल्याण, जि. ठाणे ) अशी त्यांची नावे आहेत.

या गँगकडून चेनस्नॅचिंगच्या वेगवेगळ्या तीन गुन्ह्यातील दोन लाख रुपये किंमतीचे ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. या गँगने महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा राज्यात चेनस्नॅचिंगचे सुमारे ३० गुन्हे केल्याची कबुली दिली आहे अशी माहिती पोलीस उपाअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली. यावेळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे उपस्थित होते.

Related Stories

दोन लाखांच्या चोरीचा पोलिसांनी अवघ्या सहा तासातच लावला छडा

Archana Banage

रशियात कोरोनाबाधितांची संख्या 8 लाखांवर

datta jadhav

माझ्या नातवाच्या बोलण्याला मी कवडीचीही किंमत देत नाही : शरद पवार

Tousif Mujawar

सांगली : आरगेत जनता कर्फ्यु डावलून भरला आठवडी बाजार

Archana Banage

कोल्हापूर : ललित गांधींच्या बेकायदेशीर प्लॉटिंग व उत्खननामुळे पाचगावमधील शेतकऱ्यांचे नुकसान

Archana Banage

”खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत”

Archana Banage