Tarun Bharat

इचलकरंजीत तीन पानी जुगार अड्यावर छापा; 80 हजारांचा मुद्देमाल जप्त

Advertisements

इचलकरंजी प्रतिनिधी

शहरातील शांतीनगरध्ये सुरु असलेल्या अवैध तीन पानी जुगार अडय़ावर पोलिसांनी छापा टाकला. अड्डा मालकासह जागा मालक मालक आणि सहा जुगार खेळणार्या व्यक्ती असा आठ जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 4 हजार 770 रुपये, दुचाकी आणि जुगाराचे साहित्य असा 80 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गावभाग पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा केली.

अटक केलेल्यांच्यामध्ये जुगार अड्डा मालक रमजान बाळासाहेब मुल्ला (रा. दत्तनगर, इचलकरंजी), जागा मालक संजय कलगोंडा पाटील (रा. शांतीनगर, इचलकरंजी) आशिष तानाजी पालकर (रा. सम्राट अशोकनगर, इचलकरंजी), संजय वंसत जावळे (रा. लाखेनगर, इचलकरंजी), दगडू रामचंद्र तेली (रा. रेणूका मंदिरानजीक, अब्दुललाट, ता. शिरोळ), सौरभ दिपक मगदूम (रा. मगदूम गल्ली, अब्दुललाट, ता. शिरोळ), शहाजहान गुलाबसो पट्टेकरी (रा. आण्णा रामगोंडा शाळेनजीक, इचलकरंजी), मारुती झकास लाखे (रा. लाखेनगर, शांतीनगर, इचलकरंजी) या आठ जणांचा समावेश आहे.

शांतीनगरातील संजय पाटील यांच्या मालकीच्या शेडमध्ये बेकायदेशिरपणे तीन पानी जुगार अड्डा सुरु होता. यांची माहिती गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांना बातमीदाराकडून समजली. त्यांनी आपल्या पोलीस कर्मचार्यांच्या मदतीने या जुगार अडय़ावर बुधवारी रात्री उशिरा छापा टाकला. त्यावेळी पोलिसांना या जुगार अडय़ावर जुगार अड्डा मालकासह जागा मालक आणि सहा जुगार खेळणारे अशी आठ जण मिळून आली त्यासर्वांना अटक करीत, त्यांच्याकडून 4 हजार 770 रुपयांची रोकड, दुचाकी आणि जुगाराचे साहित्य 80 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

Related Stories

पंजाबमध्ये कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 5414 वर

Tousif Mujawar

कोल्हापूर I.T.I : प्रवेशअर्ज भरण्याची नव्याने सुवर्णसंधी

Archana Banage

ज्येष्ठ शाहीर राजाराम जगताप यांचे निधन

Archana Banage

”सत्तेत आल्यापासून नरेंद्र मोदींनी केली प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी”

Archana Banage

घरगुती वीज बिल माफीसाठी १० ऑगस्टला राज्यस्तरीय धरणे आंदोलन

Archana Banage

पुलवामा चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा, एक जवान शहीद

datta jadhav
error: Content is protected !!