Tarun Bharat

पशुपालकांनो जनावरांना लस द्या, घाबरु नका

जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांचे आवाहन : लम्पीची लक्षणे दिसताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती द्या : जिल्ह्यात 108 जनावरे बाधित, 30 जनावरे लम्पीमुक्त

प्रतिनिधी/कोल्हापूर

पशुधनामध्ये होणाऱया लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी आपल्या ा†नरोगी जनावरांचे तात्काळ लसीकरण करुन आजारी जनावरांवर उपचार तत्काळ उपचार करा. बाधित अथवा लम्पीमुळे मृत्यू झालेल्या पशुधनाविषयी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये माहिती द्या. घाबरू नका असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार बैठकीत केले.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण गोवंशीय पशुधन 2 लाख 83 हजार 637 एवढे आहे. आजपर्यंत जिल्ह्यात तयार झालेल्या पाच एपिक सेंटरमध्ये एकूण बा†धत गाय वर्ग पशुधनाची संख्या 108 असून त्यापैकी 88 गाई व 20 बैल आहेत. आजपर्यंत मृत झालेले पशुधन 9 असून त्यापैकी 6 गायी व 3 बैल आहेत. 1 लाख 47 हजार 390 जनावरांचे लम्पी रोगावरील लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यापैकी शासकीय संस्थांनी केलेले लसीकरण 75 हजार 340 एवढे आहे. गोकुळ, वारणा व स्वाभिमानी आदी संघामार्फत 72 हजार 50 एवढे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात 2 लाख 85 हजार 400 एवढा लसींचा साठा उपलब्ध आहे. शनिवारपर्यंत (24 सफ्टेबर) जिल्ह्यातील सर्व गोवंशीय (गाय, बैल) जनावरांचे लसीकरण पूर्ण केले जाणार आहे. पत्रकार बैठकीत पशुसंवर्धन उपायुक्त वाय.ए.पठाण, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी विनोद पवार आदी उपस्थित होते.

लक्षणे दिसताच पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधा
लम्पी हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे जिल्ह्यात त्याचा प्रादुर्भाव होण्यासाठी वेळ लागणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपालिका आणि महापालिकेला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. लम्पीग्रस्त जनावरांची पशुवैद्यकीय दवाखान्यात माहिती दिली नाही, आणि ते जनावर दगावले तर त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळणार नाही. त्यामुळे लक्षणे दिसताच पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधा असे आवाहन रेखावार यांनी केले.

जनावरांना शक्यतो बाहेर सोडू नका
जनावरांना बाहेर सोडल्यामुळे आणि वाहनातून एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहतूक केल्यामुळे लम्पीचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे पशुपालकांनी पुढील काही दिवस जनावरे गोठय़ातून बाहेर सोडू नयेत. गोठ्य़ाची आणि जनावरांचीही स्वच्छता ठेवावी असे जिल्हाधिकारी रेखावार यांनी सूचित केले. कोल्हापूर शहरातील 135 हून अधिक मोकाट जनावरांचे लसीकरण केले असून मोकाट जनावरांची एकूण संख्या अद्याप निश्चित झालेली नाही. बाधित जनावरांसाठी क्वारंटाईन सेंटर सुरु करण्यासाठी शासनाकडून कोणत्याही सूचना प्राफ्त झाल्या नसल्याचेही रेखावार यांनी स्पष्ट केले.

Related Stories

शाहूवाडी-शिराळा सीमा अजूनही लॉकडाऊन ; नागरिक संतप्त

Archana Banage

राधानगरी धरण 75 टक्के भरले, 1425 क्युसेकने विसर्ग सुरु

Archana Banage

‘त्या’ वक्तव्याच्या निषेधार्थ कुरुंदवाडमध्ये शेलार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

Archana Banage

Kolhapur; तृतीयपंथीयांना मिळणार नोकरी

Abhijeet Khandekar

नियमांचे काटेकोरपणे पालन करा

Archana Banage

कोल्हापूर : कागलमध्ये कोरोनामुळे एकाच दिवशी बाप-लेकाचा मृत्यू

Archana Banage