Tarun Bharat

प्रयाग चिखली केंद्रावरील आयटीआयचे पेपर पुढे ढकलले

11 ते 13 ऑगस्टपर्यंतच्या पेपरचे वेळापत्रक यथावकाश प्रसिध्द होणार

Advertisements

प्रतिनिधी/कोल्हापूर

मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. कोल्हापूर जिल्हय़ातील पुरासंदर्भातील माहिती कळंबा आयटीआय प्रशासनाने मुंबई व्यवसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाला दिली. त्यानंतर बुधवारी रात्री उशिरा 11 ते 13 ऑगस्टपर्यंतचे प्रयाग चिखली केंद्रावरील सर्व पेपर स्थगित करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला, अशी माहिती आयटीआयचे प्राचार्य प्रशांत मुंडासे यांनी दिली.

शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रथम व व्दितीय वर्षातील अभ्यासक्रमाच्या परीक्षा सायबर कॉलेज आणि प्रयाग चिखली येथील परीक्षा केंद्रावर सुरू आहेत. पावसाचा जोर कायम असल्याने परीक्षेला कसे जायचे असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला होता. पावसामुळे पेपर रद्द होणार का? अशी विचारणा पालकांकडून वारंवार होत होती. त्यामुळे कोल्हापूर कळंबा आयटीआयने जिल्हय़ातील पावसाची माहिती मुंबई व्यवसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाला दिली. एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये म्हणून त्यांनी 11 ते 13 ऑगस्टपर्यंतच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. या परीक्षांचे वेळापत्रक यथावकाश आयटीआयच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना मोबाईल एसएमएसव्दारे नव्याने प्रसिध्द झालेल्या वेळापत्रकाची माहिती दिली जाईल याची नोंद विद्यार्थी, पालकांनी घ्यावी, असे आवाहन प्राचार्य मुंडासे यांनी केले आहे.

हे ही वाचा : Kolhapur Shivaji University : पुरामुळे शुक्रवार, शनिवारचेही पेपर पुढे ढकलले

गुरूवारी काही विद्यार्थ्यांची फेरी
मुंबई व्यवसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने कोल्हापूर प्रयाग चिखली केंद्रावरील 11 ते 13 ऑगस्टपर्यंतच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय बुधवारी रात्री उशिरा जाहीर केला. कळंबा आयटीआयने पेपर पुढे ढकलल्याची माहिती व्हॉटसऍप ग्रुप व एसएमएसव्दारे विद्यार्थ्यांना दिली. परंतू काही विद्यार्थ्यांपर्यंत हा एसएमएस गेला नाही. त्यामुळे गुरूवारी विद्यार्थी प्रयाग चिखली परीक्षा केंद्रावर परीक्षेला गेल्यानंतर परीक्षा रद्द झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे गुरूवारी काही विद्यार्थ्यांचा प्रयाग चिखली केंद्रावर नुसतीच फेरी झाली. त्यामुळे झालेल्या मनस्तापाबद्दल पालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

Related Stories

मराठा आरक्षण रद्द; कोरोना संकटात मराठा समाजाने संयम बाळगावा : संभाजीराजे

Abhijeet Shinde

विद्यापीठ परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू पध्दतीने घ्या

Kalyani Amanagi

गडहिंग्लज : 60 दिवस लालपरी थांबली; 35 कोटीचे नुकसान

Sumit Tambekar

दुसऱ्या डोससोबत स्वॅब टेस्टींग..!

Abhijeet Shinde

रेशनकार्डवरील व्यक्तींच्या आधार क्रमांकाचे सिडींग करा

Abhijeet Shinde

कोल्हापूर : लक्षतीर्थमध्ये बालविवाह रोखला

Abhijeet Shinde
error: Content is protected !!