Tarun Bharat

छ. शाहू महाराज राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत साता-याचा सुशांत जेधे व प्राजक्ता शिंदे विजेते

मुलांमध्ये बोरवडेचा इंद्रजीत फराकटे मुलांत विजेता; ७१६ स्पर्धकांच्या सहभागाने उत्सफुर्त प्रतिसाद

कागल / प्रतिनिधी

येथील छ.शाहू महाराज राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत पुरूषांच्या खुल्या गटात साता-याचा सुशांत जेधे तर महिला गटात साता-याच्याच प्राजक्ता शिंदे व मुलांच्या गटात बोरवडेच्या इंद्रजीत फराकटे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे, विरेंद्रसिंहराजे घाटगे, कोच आशिष रवळू,कागल पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजितकुमार जाधव, जयश्री बोरगी यांच्या हस्ते भगवा ध्वज दाखवून स्पर्धेस प्रारंभ झाला.

 लोकराजा राजर्षि छ. शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षनिमित्त श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना, राजे विक्रमसिंह घाटगे फौंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती यांनी कोल्हापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने छ.शाहू महाराज यांचा वारसा जपण्यासाठी पळा (रन फॉर लिगसी) या हेतूने  स्पर्धेचे आयोजन केले.

स्पर्धेतील इतर विजेत्यांची अनुक्रमे नावे अशीः पुरुष गट-बाळू पुकळे,आदीनाथ भोसले(दोघेही मांडरदेवी)रोहित जाधव(कोरोची)विवेक मोरे(चंदगड),ओंकार बैकर(चिपळूण), महिला गट-रोहिणी पाटील(गडहिंग्लज ), खुशी हसे (रत्नागिरी),प्राची देवकर(कराड),शिवानी कुलकर्णी(बिद्री), मुले गट-विश्वजीत लव्हटे(शिवनाकवाडी), मनोहर गडकरी(संकेश्वर),कामण्णादेवकाते(उजळाईवाडी),सुहास सावरतकर(मळगे).विजेत्यांना रोख रक्कम, सन्मान पत्र व चषक देऊन गौरवण्यात आले. तर सर्व सहभागी स्पर्धकांना टी-शर्ट, मेडल व सहभाग प्रमाणपत्र दिले.

बक्षीस वितरण कारखाना प्रधान कार्यालयासमोरील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास समोरील प्रांगणात  शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, वीरेंद्रसिंह घाटगे, प्रशिक्षक आशिष रवळू, राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे आदींनी केले.

स्पर्धास्थळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्या समोरील प्रांगणात उभारलेल्या सेल्फी पॉइंटवर स्पर्धकांनी सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली होती.

शाहूरायांना घाटगे पितापुत्रांची अनोखी मानवंदना
लोकराजा राजर्षि छ.शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षनिमित्त आयोजित या स्पर्धेत त्यांच्या जनक घराण्याचे वंशज,शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे पुरुषांच्या खुल्या गटातून किलोमीटर दहा तर त्यांचे चिरंजीव युवराज आर्यवीर घाटगे मुलांच्या गटातून १६०० मीटर धावले व त्यांनी स्पर्धा पुर्ण केली.त्यांच्या या प्रत्यक्ष कृतीतून दिलेल्या अनोख्या मानवंदनेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

Related Stories

संसदेत महिला सदस्यांना धक्काबुक्की, लोकशाहीत अशी घटना अयोग्य- नवाब मलिक

Archana Banage

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ७१० वर

Archana Banage

VIDEO>विद्यापीठाच्या अधिसभेत घुसले अभाविपचे विद्यार्थी; कुलगुरू आणि प्रशासनाविरोधात घोषणा

Abhijeet Khandekar

रोममधील विख्यात रुग्णालयानं जारी केला ओमिक्रॉन विषाणूचा पहिला फोटो

Archana Banage

ठाणे, नवी मुंबईपाठोपाठ आता KDMC मध्येही सेनेला खिंडार

datta jadhav

अखेर बाबा रामदेव यांनी मागितली महिलांची माफी; म्हणाले…

datta jadhav
error: Content is protected !!