Tarun Bharat

करण जोहरने ५० व्या वाढदिवसा निमित्त केली ‌अँक्शन चित्रपटाची घोषणा

ऑनलाईन टिम / मुंबई

चित्रपट निर्माता करण जोहर बुधवारी ५0 वर्षांचा झाला. त्याच्या वाढदिवशी, त्याने आपल्या चाहत्यांसाठी एका एक्शन चित्रपटाची घोषणा केली आहे. आलिया भट्ट आणि रणवीर सिंग अभिनीत रॉकी और रानी की प्रेम कहानी, हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर, या नव्या चित्रपटाचे शुटिंग सुरु होईल. अद्याप कोणतेच शीर्षक नसलेल्या या अॅक्शन चित्रपटाचे शूटिंग पुढल्या वर्षी एप्रिलमध्ये सुरू होईल, असे करण जोहर याने शेअर केले.

सोशल मीडियावर अपडेट शेअर करताना करणने स्वत:चे ‘प्रतिबिंब’ अशी नोट शेअर केली. त्यामध्ये तो म्हणतो, “मी आज ५0 वर्षांचा झालो ( जी संख्या दुःस्वप्नासारखी वाटते ), मला माहित आहे की हा माझ्या आयुष्यातील एक मध्यबिंदू आहे, परंतु मी माझ्या सहस्राब्दीच्या अस्तित्वापासून मदत करू शकत नाही. काहीजण मध्यम-जीवन संकट म्हणतात, मी अभिमानाने याला ‘कोणत्याही तक्रारीशिवाय जीवन’ असे म्हणतो. मी गेली 27 वर्षांहून अधिक काळ चित्रपट उद्योगात काम केले असून आतापर्यंतचा सर्वोत्तम अनुभव मिळाल्याबद्दल मी धन्य आहे!
आपल्या वाढदिवशी चित्रपटाची घोषणा करताना मात्र करणने चित्रपटाचे नाव आणि त्यातले कलाकार याची नावे उघड न करता एकप्रकारे त्याच्या चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.

Related Stories

टीकरी सीमेवर 5 फुटांचा मार्ग मोकळा

Patil_p

विद्यार्थ्यांसाठी ‘बिग क्वेश्चन बँक’ची संसदीय समितीकडून सूचना

Patil_p

आरोपीची पूर्ण ‘बायो कुंडली’ होणार तयार

Patil_p

कर्नाटक: बेळगावचा रुग्ण बरे होण्याचा दर सर्वात कमी

Archana Banage

पश्चिम बंगालमध्ये मूर्ती विटंबनेमुळे तणाव

Patil_p

पंजाबमध्ये 549 नवे कोरोना रुग्ण; 29 मृत्यू

Tousif Mujawar