पाचगाव वार्ताहर
शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर ,प्रकाश आबिटकर व नामदार एकनाथ शिंदे यांच्या फोटोला काळे फासत या फुटीर आमदारांचा करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करत सोमवारी आरके नगर येथे आंदोलन केले.
शिवसेना करवीर तालुका प्रमुख विराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरके नगर येथील मुख्य चौकात माजी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर व नामदार एकनाथ शिंदे यांच्या फलकाला काळे फासण्यात आले. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या फोटोखाली लाचार, आमदार प्रकाश आबिटकर यांच्या फोटोखाली फुटीर, तर नामदार एकनाथ शिंदे यांच्या फोटो खाली गद्दार अशी ठळक अक्षरे लिहिण्यात आली होती. या तिघांच्याही फोटोला शिवसैनिकांनी काळे फासले तसेच त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी शिवसैनिकांनी या आमदारांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी बोलताना करवीर तालुकाप्रमुख विराज पाटील म्हणाले की, ज्या भाजपने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अडीच वर्ष त्रास दिला त्या भाजपकडेच परत या असे सांगणाऱ्या या फुटीर आमदारांना कोणत्याही परिस्थितीत शिवसैनिक व महाराष्ट्रातील सुज्ञ जनता पुन्हा निवडून येऊ देणार नाही. सर्वसामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
या आंदोलनावेळी करवीर तालुकाप्रमुख विराज पाटील, उपतालुकाप्रमुख अनिल पाटील, अरुण अब्दागिरी, विवेक काटकर विभाग प्रमुख चंद्रकांत संकपाळ, रंजीत कुंडेकर, भगवान निर्मळ, गोविंद वाघमारे, पोपट खाडे, यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .