Tarun Bharat

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कसबा बीड येथे राजाभोज उद्यानासाठी विविध उपक्रम

Advertisements

कसबा बीड / प्रतिनिधी

कसबा बीड येथे राजाभोज उद्यानाची निर्मिती व वृक्षारोपण प्रारंभ केला असल्याचे राजेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले.गार्डन क्लब व कसबा बीड यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित् वेगळा उपक्रम कसबा बीड गावाने घेतला आहे. राजा भोज उद्यानामध्ये जवळपास 1000 वृक्षांची लागवड करणार  असल्याची माहिती देण्यात आली.

कसबा बीड येथील प्राचीन राजा राजाभोज यांच्या काळातील , पुर्वीचे घरमस तळे यालाच गणेश तलाव म्हणतात.याठिकाणी लोकसहभागातून  गणेश तलावाचा जिर्णोद्धार चालु असुन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त याठिकाणीच, विखुरलेल्या वृक्ष लागवड योजनेतून, गार्डन क्लब च्या सहाय्याने सुशोभिकरण अंतर्गत भव्य राजाभोज उद्यान उभारण्यात येणार आहे असे वृक्षारोपण कार्यक्रम शुभारंभ प्रसंगी पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी यांनी प्रतिपादन केले. याचठिकाणी कल्लेश्वर  क्रीडांगण ही उभारण्यात येत आहे.याशिवाय ओपण जिम, वृद्धांच्यासाठी पार्क आणि सुशोभीकरण अंतर्गत सुंदर असे राजाभोज उद्यान होणार आहे. याचाच एक भाग म्हणून गार्डन क्लब कोल्हापूर व ग्रामपंचायत कसबा बीड यांचे संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.                  
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुंभी कासारी साखर कारखान्याचे संचालक उत्तमराव वरुटे होते. यावेळी निवृत वनअधिकारी विजय सावंत, गार्डन क्लब च्या अध्यक्षा कल्पना सावंत , यांनी मनोगत व्यक्त केले. या वृक्षारोपण कार्यक्रमावेळी उद्यानाला राजाभोज उद्यान असे नाव सर्वानुमते देण्यात आले. सुत्रसंचलन कृष्णात गावडे, आणि आभार प्राथमिक शिक्षक बबन गावडे यांनी मानले. 
                    
यावेळी निवृत वनाधिकारी विजय सावंत, गार्डन क्लब च्या अध्यक्षा कल्पना सावंत, पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, गोकुळ चे माजी संचालक सत्यजीत पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रताप पाटील, तंटामुक्त अध्यक्ष शामराव सूर्यवंशी, संरपंच दिनकर गावडे, उपसरपंच श्रीनिवास पाटील,अमित वरुटे,दिनकर सूर्यवंशी, शिरोली दुमाला चे सरदार पाटील, बाजीराव कांबळे, भगवान सूर्यवंशी , निलेश सूतार ग्रामसेवक महेश खाडे, याचबरोबर गार्डन क्लब चे उपाध्यक्षा शशी कदम, सचिव पल्लवी कुलकर्णी,व ग्रामपंचायत सदस्य, श्री कल्लेश्वर क्रीडांगण समिती,, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

गुणवंत विद्यार्थी खाजगी शिकवणीचे असताना यशाचे श्रेय तुम्ही घेताच कसे ?

Archana Banage

महिलांची स्पेशल बस टॉप गिअरवर; 15 दिवसांत 5500 महिलांनी घेतला लाभ

Abhijeet Khandekar

कोल्हापूरचे आय.जी. ऑफीस पुण्याला हालवण्याचा डाव

Abhijeet Khandekar

हवाल्याचे 10 कोटी रुपये वेल्लोर येथून जप्त; चौघे ताब्यात

Abhijeet Khandekar

‘मुन्नाच्या’ विजयावर ‘बंटी’ बोललेच, म्हणाले ‘आम्ही जे करायचं ते रणांगणात करतो

Abhijeet Khandekar

भादोलेत वयोवृद्ध शेतकऱ्याचा विहिरीत बुडून मृत्यू

Archana Banage
error: Content is protected !!