Tarun Bharat

Kolhapur; कोगे- कुडित्रे दरम्यान वाहतूक बंद; पुलावर अडकला मृत गवा रेडा

कसबा बीड /प्रतिनिधी

गेल्या आठवड्यापासून सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुराच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. मंगळवारी सायंकाळी 7.30 वाजता कोगे- कुडित्रे पुलावर पाणी आले आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या कुंभी कासारी साखर कारखान्याचे कामगार, शालेय व महाविद्यालय विद्यार्थी, तसेच प्रवाशांची गैरसोय झाली आहे. पर्यायी मार्ग म्हणून कुडित्रेला जाण्यासाठी बालिंगामार्गे वाहतूक सुरू आहे.

अधिक वाचा- महे- कसबा बीड पुलावर पाणी; वाहतूक बंद

कोगे- कुडित्रे पुलावर मृत गवा रेडा अडकलेला आढळून आला. मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणापातळी वाढून पूर नियंत्रण रेषेबाहेर जात आहे. वाढत्या पाण्याबरोबर जनावारे आणि इतर वस्तू वाहत येत असतात. आज कोगे- कुडित्रेदरम्यान असणाऱ्या या नवीन पुलावर पुर्ण वाढ झालेला गवा रेडा तरंगताना दिसत आहे.

पूर पाहण्यासाठी नागरिकांनी पाण्यात उतरू नये असे गावच्या सरपंच अंबाबाई पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

Related Stories

कोल्हापूर : मसाई पठाराच्या पायथ्याशी रस्ता खचला

Archana Banage

कोल्हापुरात सीबीआयकडून बड्या अधिकाऱ्यास अटक

Archana Banage

उदगावात आठ वर्षाच्या बालकावर काळाचा घाला; मृतदेह बाहेर काढताचं कुटुंबियाचा आक्रोश हृदय पिळवटणारा

Abhijeet Khandekar

सांगली लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीचा डोळा !

Archana Banage

राजू शेट्टी सैनिक नसलेले सेनापती – पाशा पटेल

Archana Banage

Photo: भारत जोडो यात्रेत कोल्हापुरी फेट्यांचा रुबाब

Archana Banage