तरुण भारत

केएसएच्या मुलींचा फुटबॉल संघ नाशिकला रवाना

17 वयोगट आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; विफातर्फे आयोजन

कोल्हापूर प्रतिनिधी

वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनने नाशिक येथे आयोजित केलेल्या 17 वर्षांखालील मुलींच्या गटाच्या आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेसाठी कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनचा (केएसए) संघ नुकताच रवाना झाला. केएसएच्या संघाचा सलामीचा सामना रविवारी (दि. 15) वाशिम-जळगांव जिल्हा संघाबरोबर होणार आहे. ही स्पर्धा 12 ते 18 मे या कालावधीत होणार आहे.

या स्पर्धेसाठी के.एस.ए. कोल्हापूर जिल्हा संघ निवडीसाठी 25 एप्रिल ते 10 मे या कालावधीत छत्रपती शाहू स्टेडियम येथे शिबिर घेण्यात आले. केएसएचे जॉईंट जनरल सेक्रेटरी नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एआयएफएफ डी लायसन्स कोच अमित साळोखे, निखील कदम, अमित शिंत्रे व पृथ्वी गायकवाड यांना शिबिरात मार्गदर्शन केले.

या संघास केएसएचे आश्रयदाते श्रीमंत शाहू छत्रपती, माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन महिला समिती सदस्या व विफाच्या महिला समिती चेअरमन मधुरिमाराजे छत्रपती यांचे प्रोत्साहन लाभले. दरम्यान, संघ रवाना होण्यापूर्वी मधुरिमाराजे छत्रपती यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी के.एस.ए.चे पदाधिकारी माणिक मंडलिक, राजेंद्र दळवी, नंदकुमार बामणे, संभाजीराव पाटील-मांगोरे, दीपक घोडके उपस्थित होते.

केएसए कोल्हापूर जिल्हा महिला संघ असा : धनश्री किरण गवळी (कर्णधार), सानिया भगवान पाटील (उपकर्णधार), स्नेहल सुधीर सुतार (गोलरक्षक), प्रत्युषा राहूल नलवडे( गोलरक्षक), आरती संजय काटकर, स्नेहल सर्जेराव खोत, स्वाती दिपक कानडे, दिव्या विजय माने, सौम्य्या विनोद कागले, निदा निसार सतारमेकर, सानिका दत्तात्रय भोसले, मुक्तांजली इंद्रजीत सावंत, राजनंदिनी रमेश भोईटे, तनुजा सुरेश चौगुले, हर्षदा सुभाष काटे, सृष्टी वैभव देसाई, मृणाली महेश चौगुले, शर्वरी प्रमोद डोणकर. या संघाचे मार्गदर्शक म्हणून अमित साळोखे व व्यवस्थापक म्हणून कु. पृथ्वी गायकवाड हे काम पाहतील.

Advertisements

Related Stories

कोल्हापूर : साखर कारखान्याने अडचणीत असल्याने `अंकुश’ने आंदोलन मागे घ्यावे; मंत्री सतेज पाटील यांचे आवाहन

Abhijeet Shinde

कोल्हापूर : गडमुडशिंगी येथील ‘त्या’ मायलेकींची आत्महत्या नसून खून झाल्याचे उघड

Abhijeet Shinde

कोल्हापूर : ‘ज्वारी’ पिकाला शेतकऱ्यांची पसंती

Abhijeet Shinde

अखिलेश यादव यांच्या निकटवर्तीयांच्या घरी प्राप्तिकरचे छापे

datta jadhav

पाक सरकार खरेदी करणार ‘या’ दिग्गज अभिनेत्यांची घरे

datta jadhav

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण

Rohan_P
error: Content is protected !!