शिये वार्ताहर
भुयेवाडी (ता. करवीर) येथील भागीरथी मंदिराच्या पायरीवर षुरुष जातीचे अर्भक मंगळवारी सकाळी पूजा करण्यासाठी व दर्शनासाठी गेलेल्या लोकांना आढळून आले आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की भुयेवाडी येथील भागीरथी माळावर असलेल्या भागीरथी मंदिरात दिलीप पाटील हे नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास पूजा करण्यासाठी गेले होते. त्यांच्या पाठोपाठ कृष्णात पाटील व त्यांचा भाच्याचा मुलगा दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी कृष्णात यांचा भाच्याच्या निदर्शन एक बॉक्स आला. तो बॉक्स त्या मुलाने उघडून पाहिला. तर त्याला लहान मुल दिसले. त्याने आपले मामा व येथील लोकांना दाखवले असता. यामध्ये लहान मुलगा जिवंत असल्याचे निदर्शनास आले. ग्रामस्थांनी व भुयेवाडीचे पोलीस पाटील विश्वास पाटील यांनी तात्काळ करवीर पोलीसांना फोन करून सदर माहिती सांगितली. त्यानंतर तात्काळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांनी ते अर्भक बॉक्स मधून बाहेर काढल्यानंतर ते रडु लागले. ते दोन दिवसाचे असू शकते अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. व अर्भकास पुढील वैद्यकीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे.