Tarun Bharat

kolhapur; जिल्ह्यातील निष्ठावंत खासदार शिंदे गटात, मंडलिक,माने उद्या पत्रकार परिषेदेत करणार घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या ऑनलाईन बैठकीत दोघांची उपस्थिती
-उद्या पत्रकार बैठकीत होणार शिक्कामोर्तब
-आगामी लोकसभा निवडणूकीच्या राजकारणासाठी निर्णय घेतल्याची चर्चा

कोल्हापूर; कृष्णात चौगले

‘आम्ही शिवसेनेसोबतच’ असे छातीठोकपणे सांगणारे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी सोमवारी शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केला. शिवसेनेचे बारा खासदार शिंदे गटात गेले असून त्यामध्ये जिह्यातील दोन्ही खासदार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मुंबई येथील एक हॉटेलमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बारा खासदारांच्या ऑनलाईन बैठकीत खासदार मंडलिक आणि माने यांचा समावेश असल्याचे समजते. मंगळवारी दिल्ली येथे होणाऱया पत्रकार बैठकीत बंडखोर खासदार आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामध्ये जिह्यातील दोन्ही खासदारांकडून शिंद गटातील प्रवेशाबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

हमीदवाडा येथे झालेल्या मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये खासदार मंडलिक यांनी शिंदे गटासोबत जावे अशी कार्यकर्त्यांनी आग्रही मागणी केली. सत्तेच्या बाजूने असेल तर आपल्याला निधी खेचून आणता येईल अशी भूमिका या मेळाव्यामध्ये मांडण्यात आली. त्यामुळे त्यांची आगामी राजकीय दिशा काय असेल ? हे सोमवारीच स्पष्ट झाले.

याबाबत दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार मंडलिक म्हणाले, आठवडाभरापूर्वी मी दिवसांपूर्वी लेबर कमिटीच्या बैठकीसाठी निमित्ताने दिल्लीत आलो होतो. तेव्हा काही खासदारांनी मला शिंदे गटाच्या बाजूने येण्याची विनंती केली होती. त्यामुळेच मी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांची मते आजमावली. या मेळाव्यात शिंदे गटासोबत जाण्याची कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. कोल्हापूरात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग झाला होता. तोच राज्याच्या राजकारणातही रुजला. पण सत्तेचा फायदा शिवसेनेपेक्षा मित्र पक्षांनाच अधिक झाला. ज्यांच्या विरोधात मी लढलो ते दुसऱया बाजूने आहेत. त्यांचे काय होणार याचा विचार करावा लागेल. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मला माझ्या भावाप्रमाणे आहेत. विस्कटलेले कुटूंब सांभाळण्याची त्यांची जबाबदारी आहे. पण दुर्दैवाने ते झाले नाही. मातोश्री किंवा अन्य कुठल्याही ज्येष्ठ नेत्यांनी माझ्याशी अद्याप बोलण्याचा प्रयत्न नाही असे खासदार मंडलिक यांनी प्रसार माध्यमांसमोर स्पष्ट केले.

ते बारा खासदार कोण ?
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईहून झालेल्या ऑनलाईन बैठकीस उपस्थित असणाऱया खासदारांमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय मंडलिक व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशिल माने यांचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. लोकसभेत शिवसेनेचे एकूण 18 खासदार आहेत. त्यापैकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत गेलेल्या खासदारांमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे, हेमंत गोडसे, भावना गवळी, संजय मंडलिक, धैर्यशिल माने, सदाशिव लोखंडे, हेमंत पाटील, श्रीरंग बारणे, प्रतापराव जाधव, कृपाल तुमाने, राहुल शेवाळे, राजेंद्र गावित यांचा समावेश असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. बारा खासदारांच्या स्वतंत्र गटाला मान्यता द्यावी म्हणून मंगळवारी ते लोकसभा सभापतींना भेटणार आहेत. स्वतंत्र गटाच्या प्रतोदपदी राहुल शेवाळे यांचे निवड करण्यात आली आहे

Related Stories

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; केली ‘ही’ मागणी

Tousif Mujawar

भाजप मनुवादी सरकारकडून ओबीसांना संपवण्याचा घाट

Patil_p

जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगची दहशत; यांची झाली हत्या…

Kalyani Amanagi

परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम ; जयंत पाटलांच्या हॉकी संघाला हटके शुभेच्छा!

Archana Banage

संगमेश्वर तालुक्यात मृत कावळे सापडल्याने खळबळ

Patil_p

नूतन आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील क्वारंटाईन

Archana Banage