Tarun Bharat

शिरोळ तालुक्यात लम्पीचा दुसरा बळी

शिरोळ/प्रतिनिधी

शिरोळ तालुक्यातील कुटवाड येथे लम्पीस्किन आजाराने एका गायीचा आज शुक्रवारी सकाळी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बळी गेला तर येथील हरोली ता (शिरोळ)  येथील आठ दहा दिवसापूर्वी  एका गायीचा बळी गेला होता. शिरोळ तालुक्यात लम्पीस्किनचा दुसरा बळी आहे. दरम्यान, या गायीला लंपी रोगाची लागण झाली होती की अन्य रोगाने बळी गेला याची माहिती मिळू शकलेली नाही. तर कुटवाड येथील सुनीता पाटील त्यांच्या  एका गाईला लम्पी त्वचा स्किनची लागण झाली आहे यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण आहे.

शिरोळ तालुक्यात दुभत्या गायींना आठ दहा दिवसापासून या लम्पीस्किनने ग्रासले आहे. कुटवाड येथील दत्तात्रय रामचंद्र पाटील या शेतकऱ्यांच्या जर्सी गायीला दहा-बारा दिवसापूर्वी लंपी त्वचारोगाची लागण झाली होती. यावर हसूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सागर पटेल यांनी औषध उपचार करीत होते. या जर्सी गायीला ताप आला होता. त्यामुळे वैरण खाणे सोडले होते शुक्रवार दि. १६ रोजी पहाटे पाच वाजता या लम्पी स्किनने या गाईचा बळी गेला यामुळे पशुपालन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून शेतकरी भीतीच्या छायेखाली आहे.

हरोली (ता. शिरोळ) येथील काशीनाथ महादेव कदम या शेतकऱ्यांने जर्सी गाय आणली होती या गाईला ताप आला होता. त्यामुळे गायीने चारा खाणे सोडून दिले होते. तसेच अंगावर फोड्याही उठल्या होत्या. त्यामुळे गायीचा मृत्यू लम्पिने की अन्य कशाने झाला, याबाबत संभ्रमावस्था आहे.

याबाबत जि प चे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर  शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हरोली येथील  मृत्यू पावलेल्या गायीचा पंचनामा करण्या अगोदरच या शेतकऱ्यांनी त्याची विलेवाट लावली त्यामुळे लंपी की निमोनिया कशामुळे मृत्यू झाला याबाबत सांगणे कठीण असल्याचे सांगून हरोली, यड्राव  यासह तालुक्यात लसीकरणास भर दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

हालोंडीत रस्त्याच्या वहिवाटीवरुन दोन कुटुंबात मारामारी, सहा जखमी

Archana Banage

अथणी शुगर्सचे अंतिम बिल २८०० रुपये प्रमाणे

Archana Banage

कोल्हापूर जिल्हय़ात 1395 नवे कोरोना रुग्ण, 45 मृत्यू

Archana Banage

कडकनाथ कोंबडी प्रकरणात कुंभोज परिसरातील शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान

Archana Banage

काश्मिरमध्ये दोन आतंकवाद्याना कंठस्थान घातलेल्या मोहरेच्या जवानाचे कौतुक

Archana Banage

चंदगड-तिलारी मार्गाचे काम रखडले, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

Kalyani Amanagi