Tarun Bharat

महावितरणच्या अभियंत्यासह कर्मचाऱ्यास मारहाण

दोघांविरुध्द गुन्हा दाखल

प्रतिनिधी/कोल्हापूर

इचलकरंजी शहरात गोसावी गल्ली येथे शुक्रवारी वीज बिल वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याचे कारणावरून सहाय्यक अभियंता मोहन कोळेकर व बाह्यस्त्रोत कर्मचारी युवराज माळी यांना धक्काबुक्की व मारहाण करण्यात आली. या प्रकरणी बंडू प्रकाश शेख व मुन्ना जाधव यांचेविरुद्ध शिवाजीनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोसावी गल्ली, इचलकरंजी येथील वीज ग्राहक घुडूलाल सय्यद यांचे मागील तीन महिन्याचे वीज बिल थकीत होते. सदर वीज बिलाच्या वसुलीकरिता बाह्यस्त्रोत कर्मचारी युवराज माळी यांनी वीज पुरवठा खंडित करणार असल्याचे सांगितले. तो खंडित करताना बंडू प्रकाश शेख यांनी वीज कर्मचारी माळी यांची अडवणूक करून दमदाटी करीत मारहाण केली. त्या ठिकाणी आलेले सहाय्यक अभियंता मोहन कोळेकर व पुन्हा युवराज माळी यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करीत बंडू शेख व मुन्ना जाधव यांनी मारहाण केली.

इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस स्थानकात भादवि 1860 च्या कलम 323,341,353, 504 व 34 नुसार शासकीय कामात अडथळा, धक्काबुक्की, शिवीगाळ , मारहाण केल्या प्रकरणी बंडू शेख व मुन्ना जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

पुंगाव येथे कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Archana Banage

दोनवडेनजीक मोटरसायकल अपघातात एक ठार, एक जखमी

Archana Banage

कोल्हापूरच्या सुपूत्राच्या संशोधन प्रस्तावास नासाची मंजूरी; डॉ.करण देवणे यांचा सन्मान

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : सॅनिटायझर बाटलीच्या स्फोटात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

Archana Banage

रूई येथे कोरोनाचा दुसरा रूग्ण आढळला

Archana Banage

संभाजीराजे छत्रपतींच्या भाषणाकडे अनेकांचे लक्ष; राजकीय घडामोडींवर नेमके काय बोलणार?

Archana Banage