Tarun Bharat

मलकापूर येथे हनुमान चालीसा पठण करून महाआरती; मनसे पदाधिकारी पोलीसांच्या ताब्यात

शाहुवाडी प्रतिनिधी

मलकापूर तालुका शाहूवाडी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मलकापूर शहर व हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने मलकापूर शहर प्रमुख अजय गुरव यांच्या नेतृत्वाखाली मारुती मंदिर समोर हनुमान चालीसा पठण करून महाआरती करण्यात आली यावेळी मनसेचे जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते महाआरती झाल्यानंतर मनसे पदाधिकारी यांना पोलीसांनी ताब्यात घेतले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार हनुमान चालीसा पठण व महाआरती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर मलकापूर येथील मारुती मंदिरासमोर महाआरती व हनुमान चालीसा पठण करण्यात आली. या प्रसंगी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटकर  ‘सहकार सेनेचे अध्यक्ष सतीश तांदळे, शाहुवाडी तालुका अध्यक्ष धनाजी आगलावे, बाळासाहेब कदम, प्रवीण कांबळे, डॉ. संजय गांधी, रमेश पडवळ, महेश विभूते, उत्तम शिंगटे, चेतन गुजर, रूपेश वारंगे, यांच्यासह मनसे व हिंदूत्ववादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

Related Stories

एसटीच्या 360 हून अधिक फेऱया सुरू

Patil_p

Kolhapur; मिणचे सळीचोरी प्रकरणी तिघांना अटक; दोन दिवस पोलिस कोठडी

Abhijeet Khandekar

महिलेचा ‘महिला पोलिस’ला चोप

Archana Banage

Sakinaka Rape Murder Case : दोषीला फाशीची शिक्षा ; न्यायालयाचा निर्णय

Archana Banage

भाजपच्या दोन मुख्यमंत्र्यांना पोटनिवडणुकीचा फटका

Archana Banage

सातारा : पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा जिल्हा दौरा

Archana Banage