महिलेला अघोरी कृत्य करण्यास पडले भाग : पती, सासू, सासऱ्यांवरही गुन्हा दाखल
प्रतिनिधी/पुणे, इचलकरंजी
पुत्रप्राप्ती होण्यासाठी विवाहितेला अघोरी कृत्य करण्यास प्रवृत्त करण्याऱया शहरातील मांत्रिक मौलाना बाबा जमादार (रा. गावभाग, इचलकरंजी) याला पुणे येथील भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. पिडीतेला पतीने सर्वांसमोर अंघोळ करायला लावल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील मालेश्वर धबधब्यानजीक घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी मांत्रिक जमादारसह पिडीतेचा व्यावसायिक पती, सासू, सासऱयाविरोधात पोलिसांनी दाखल केला आहे.
याबाबतची माहिती अशी, पिडीतेचा 2013 मध्ये विवाह झाला आहे. पिडीतेला कौटूंबिक कारणावरुन शिवीगाळ करीत मारहाण केली जात होती. पिडीतेच्या वडीलानी विवाहावेळी तीला दिलेले सुमारे 1 कोटीचे दागिणे पतीने परस्पर विकले. सासऱयाकडून व्यवसायासाठी 2 कोटी रुपये घेवून त्यांची फसवणूक केली. पिडीतेच्या प्लॅटची कागदपत्रे परस्पर बँकेला देवून, त्यावर खोटी सही करुन बँकेकडून सुमारे 75 लाख रुपयांचे कर्ज काढले. या प्रकारानंतर घरात सुख-शांती नांदावी. यासाठी पिडीतेला उपासतापास करायला लावून मुलगा व्हावा, यासाठी पती, सासू सासरा यानी मांत्रिक मौलाना जमादार याच्या सांगण्यावरुन पिडीतेला अघोरी कृत्य करण्यास भाग पाडले.
पुणे पोलिसांची कारवाई
याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअन्वये गुन्हा दाखल झाला आहे. वरि÷ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर तपास करीत होते. तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, कर्मचारी रविंद्र चिप्पा आणि अशिष गायकवाड हे कोल्हापूरला रवाना झाले. गोपनीय खबरीच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार मांत्रिकाला इचलकंरजी येथून ताब्यात घेऊन भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आणण्यात आले. ही कारवाई उपायुक्त सागर पाटील, सहाय्यक आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर, निरीक्षक (गुन्हे) संगिता यादव, विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी उपनिरीक्षक नितीन शिंदे, पोलीस अंमलदार रविंद्र चिप्पा, गणेश भोसले, अवधुत जमदाडे, आशिष गायकवाड, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, नीलेश खैरमोडे, विक्रम सांवत यांनी केली. याप्रकरणी पती शिवराज कोरटकर (वय 36), सासरे राजेंद्र कोरटकर (वय 64), सासू चित्ररेखा कोरटकर (वय 62), मांत्रिक मौलाना बाबा जामदार अशी संशयीतांची नावे आहेत. हा प्रकार 3/5/2022 ते आजपर्यन्त यादरम्यान घडला.