मुंबई : प्रतिनिधी
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ३५० फुटाचे भव्य स्मारक इंदू मिल येथे उभारण्यात येणार आहे. या स्मारकाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र सरकारने दोन सदस्यांची नियुक्ती केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार घडवत आहेत. पुतळ्याची पाहणी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आज करणार आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा ३५० फूट उंच तसेच कांस्य धातूपासून बनवला जात आहे. हा पुतळा १०० फूट उंचीच्या ( एकूण उंची ४५० फूट ) चौथऱ्यावर बसवण्यात येत आहे हे या स्मारकाचे चे मुख्य वैशिष्ट्य आहे. या पीठावर बौद्ध स्थापत्य शैलीतील घुमट आहे. १००० क्षमतेचे सभागृह, प्रदर्शन हॉल, संशोधन केंद्र, व्याख्यान सभागृह, वाचनालय, बैठक सभागृह, ध्यान केंद्र, परिक्रमा पथ, स्मरणिका दुकाने, प्रतीक्षाकक्ष, उपहारगृह, प्रशासकीय कार्यालय, स्वच्छतागृहे, गार्डन पार्किंग इत्यादी गोष्टींचा या स्मारकामध्ये समावेश आहे. या स्मारकाचा आरखडा हा यापूर्वी अस्तित्वात असणाऱ्या तज्ज्ञ मंडळींच्या सूचनांप्रमाणे बनवण्यात आला असून २४ मार्च २०२३ पर्यंत हा पुतळा पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले.