Tarun Bharat

धुळे शहरात राजर्षी शाहू महाराजांचे स्मारक

राजवर्धनसिंहराजे कदमबांडे यांची माहिती; पूर्णाकृती पुतळय़ाचे काम पूर्णत्वाकडे, लवकरच अनावरण

Advertisements

कोल्हापूर प्रतिनिधी

धुळे शहरात लोकसहभागातून उभारण्यात येणाऱया राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुर्णाकृती पुतळय़ाचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत काम पूर्ण होताच लवकरच पुतळारूपी स्मारकाचे अनावरण केले जाईल, अशी माहिती शाहू महाराजांचे पणतू धुळय़ाचे माजी आमदार आणि धुळे नंदुरबार जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष राजवर्धनसिंहराजे कदमबांडे यांनी दिली.

धुळे येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त श्रीमंत राजवर्धनसिंहराजे कदमबांडे व राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक समिती यांच्या तर्फे मराठा सेवा संघाच्या कार्यालयामध्ये मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी झेड. बी पाटील महाविद्यालयाचे प्रा.डॉ. प्रविणसिंह गिरासे यांचे शाहू चरित्रावर व्याख्यान झाले. माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार डॉ.सुभाष भामरे, आमदार कुणालबाबा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. श्रीमंत राजवर्धनसिंहराजे कदमबांडे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याची व एक आदर्श राजाचे जिवन जगताना समाजहितासाठी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती धुळेकरांना दिली.यावेळी श्रीमंत यशवर्धनराजे कदमबांडे, प्रकाश पाटील ,माजी महापौर मोहनभाऊ नवले, गुलाबराव बाबा पाटील, माजी महापौर प्रदीप नाना कर्पे, सुधाकर दादा बेंद्रे,किरण शिंदे, माजी स्थायी समिती सभापती संजय जाधव, दिलीप आप्पा साळवे, भाजपाचे प्रवक्ते संजय शर्मा, महेश भाऊ मिस्त्राr, राजेंद्र देसले, राजेंद्र इंगळे, शिवाजी दादा पवार, योगीराज मराठे, हरिचंद्र लोंढे , गजेंद्र अंपळकर साहेबराव देसाई, निंबानाना मराठे, संदीप पाटोळे, विरेंद्र मोरे व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.

Related Stories

व्यापारी संघटनांनी स्वतः नियोजन करावे- जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

शेतकरी समाधानी, कारण गतवर्षाच्या तुलनेत 40 टक्के अधिक पाऊस

Rahul Gadkar

10 लाखाची लाच घेताना एलसीबीचे दोन कॉन्स्टेबल जाळ्यात

Sumit Tambekar

TMC ला गळती; आणखी एका आमदाराने सोडली साथ

datta jadhav

दहावी परीक्षेबाबत निर्णय आज ?

Rohan_P

हॅट्रीकचे स्वप्न पाहणार्‍या चंद्रकांत दादांची बोल्ड उडणार : पालकमंत्री सतेज पाटील

Abhijeet Shinde
error: Content is protected !!