Tarun Bharat

Kolhapur : मोटारसायकल चोरट्यास अवघ्या १२ तासाच्या आत मुद्देमालासह जेरबंद

शिरोळ प्रतिनिधी

शिरोळ पोलीसांनी नांदणी येथून चोरीस गेलेली मोटर सायकलचा शोध घेऊन अवघ्या 12 तासाच्या आत मोटरसायकल चोरटा वाहिद रहीम पिंजारी उर्फ नदाफ (रा. नांदणी) यास अटक करून चोरीची मोटरसायकल जप्त केली.

शिरोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २८ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी तीन ते सहा या वेळेत नांदणी ते हरोली जाणाऱ्या रस्त्याचे कडेला पार्क केलेली हिरो कंपनीची एचएफ डिलक्स मोटर सायकल नं. एम.एच.०९ डी.जी. ५१८२ चोरीला गेली होती.

या गुन्हयाबाबत बातमीदारमार्फत बातमी काढून सदर गुन्हयातील संशयीत आरोपी वाहीद रहीमान पिंजारी उर्फ नदाफ व. व. २७, रा. गैबी पिराजवळ, नांदणी याचा सदर गुन्हयात सहभाग असलेबाबत खात्री झाली. आरोपीस सापळा रचुन नांदणी माळभाग परीसरातुन शिताफीने ताब्यात घेतले. सदर गुन्हयाबाबत त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्हयाची कबुली दिली. २०,००० रुपये किंमत असलेली हस्तगत करण्यात आली आहे. सदर आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्यास २ दिवस पोलीस कोठडी सुनावली गेली. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार दिलीप कुंभार हे करीत आहेत.

Related Stories

खोची- दुधगाव बंधारा पाण्याखाली; वारणेचे पाणी प्रथमच पात्राबाहेर

Abhijeet Khandekar

‘कोविड प्रतिबंधासाठी स्वॅब तपासणी करा’

Archana Banage

राधानगरी शहर स्थापना दिन सोहळा उत्साहात साजरा

Archana Banage

Sangli; एक कोटीची लाच मागणारा बडतर्फ पोलिस जॉन तिवडे अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Abhijeet Khandekar

कोल्हापुर जिल्हा क्रशर डंपर, खाण असोसिएशनच्यावतीने डंपर व गाढव मोर्चा

Archana Banage

राज्यातील सहाही विधानपरिषद जागा भाजप जिंकणार

Abhijeet Khandekar