कोल्हापूर हे देशातील महत्त्वाचे शहर आहे. कोल्हापूर विकासाच्या प्रगतीपथावर असून कोल्हापूर- मुंबई विमानसेवा दसऱ्यापूर्वी सुरू होईल. तसेच कोल्हापूर बेंगलोर कनेक्टिव्हिटी सुरू करणार असल्याचे केंद्रीय विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदिया यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. नवीन टर्मिनल इमारतीचे काम सुरू असून मार्च 2023 पर्यंत हे काम पूर्ण होईल. नवीन धावपट्टी 23 00 मीटर पर्यंत पाहिजे असे ते म्हणाले. नाईट लँडिंग चे काम पूर्ण झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.
मुंबई विमानतळ सुरू करावे अशी मागणी उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्योतिरादित्य सिंधिया याच्या कडे केली होती. नवरात्र महोत्सवापूर्वी ५ ऑक्टोंबरला कोल्हापूर- मुबई विमानसेवा सुरू होणार असल्याने नवरात्रीला आंबाबईच्या दर्शनासाठी येण्याचा भक्ताचा मार्ग मोकळा झाला आहे. आता कमी वेळात विमानाने भक्त येतील असे चंद्रकांतदादा म्हणाले.

