ऑनलाईन टीम/तरुण भारत
कोल्हापूर: संपूर्ण कोल्हापूरवासियांचे (Kolhapur) लक्ष लागून राहिलेल्या आगामी कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठीचे (Municipal Election 2022) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला आरक्षण आज निश्चित झाले. यामध्ये 31 प्रभागातील 92 जागांसाठीचे आरक्षण जाहीर झाले आहे. महापालिकेची सदस्यसंख्या 92 आहे. तर महिला आरक्षण असल्याने महिलांची सदस्यसंख्या 46 एवढी झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महाविकास आघाडी (MahavikasAghadi) सरकारविरुद्ध भाजप (BJP) अशी लढत या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 14 महापालिकांना 31 मेपर्यंत प्रभागनिहाय आरक्षण (Ward wise reservation) सोडत जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोडत प्रक्रिया पार पडली. या सोडतमध्ये मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकांचा समावेश आहे.
कोल्हापूर महापालिकेचे एकूण प्रभागानुसार 31 नगरसेवकांची संख्या आहे. तर 92 त्रिसदस्य प्रभाग, 30 द्विसदस्य प्रभाग आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षित प्रभाग 1,अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित होणारे प्रभाग 6 ,अनुसूचित जमाती प्रभाग संख्या 1,सर्वसाधारण महिला प्रभाग 40 आणि खुला प्रभाग 39 /40 असा आहे.सध्या कोल्हापुरात काँग्रेसचे 30 नगरसेवक, राष्ट्रवादी- 15, शिवसेना- 04, ताराराणी आघाडी- 19, भाजप- 13 असे एकूण 81 नगरसेवक आहेत.
आरक्षण जाहीर झालेले प्रभाग
अनुसूचित जाती
(महिला)प्रभाग क्रमांक – 7 अ, 4 अ, 9 अ,13 अ, 28 अ, 30 अ.
अनुसूचित जाती आरक्षित प्रभाग
प्रभाग क्रमांक – 15 अ, 19 अ, 21 अ, 5 अ , 1 अ, 18 अ
अनुसूचित जमाती
प्रभाग क्रमांक – 2 अ
सर्वसाधारण आरक्षित प्रभाग
प्रभाग क्रमांक – 1 क, 2 क, 3 ब, 3 क, 4 क, 5 क, 6 क, 7 क, 8 क, 9 क, 10 ब, 10 क, 11 क, 12 ब, 12 क, 13 क, 14 क, 15 क, 16 क, 17 क, 18 क, 19 क, 20 क, 21 क, 22 क, 23 क, 24 क, 25 क, 26 क, 27 क, 28 क, 29 क, 30 क, 31 ब
सर्वसाधारण साधारण महिला आरक्षित प्रभाग
प्रभाग क्रमांक – 1 ब, 2 ब, 3 अ, 4 ब, 5 ब , 6 अ, 6 ब, 7 ब, 8 अ, 8 ब, 9 ब, 10 अ, 11 अ, 11 ब, 12 अ, 13 ब, 14 अ, 15 ब, 16 अ, 16 ब, 17 अ, 18 ब, 19 ब, 20 अ, 21 ब, 22 अ, 22 ब, 23 अ, 24 अ, 24 ब, 25 अ, 25 ब, 26 अ, 27 अ, 27 ब, 28 ब, 29 अ, 30 ब, 31 अ.