Tarun Bharat

‘ओबीसी’ उमेदवारांच्या वाट्याला संघर्ष

ओपनमधील 79 प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार; तगड्या उमेदवारांचा सामना करावा लागणार

Advertisements

विनोद सावंत कोल्हापूर

राज्यातील ओबीसीचे राजकीय आरक्षणाबाबत अद्यापही निर्णय प्रलंबितच आहे. अशा स्थितीत कोल्हापूर महापालिकेची निवडणुकीची प्रक्रिया गतिमान झाली असून, मंगळवारी ( दि. 31) ओबीसी शिवायच आरक्षण सोडत काढली जाणार हे निश्चित आहे. ओबीसी उमेदवारांना ओपनमधील प्रभागातूनच निवडणूक लढवावी लागणार असे सध्याचे चित्र आहे. परिणामी तगडय़ा उमेदवारांचा सामना करावा लागणार असल्याने ओबीसींच्या वाट्याला या निवडणुकीत संघर्ष करावा लागणार आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपून दीड वर्ष होत आले तरीही नवीन सभागृह अस्तित्वात आलेले नाही. निवडणूक लांबणीला कोरोना, प्रभाग रचनेतील बदल हे कारणीभूत आहे. असे असले तरी ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक होऊ नयेत. यासाठी महाविकास आघाडीची धडपड सुरू होती. परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये रखडलेल्या निवडणुकांविरोधात 13 याचिका दाखल झाल्या. न्यायालयाने तत्काळ निवडणुका घेण्याचे आदेश दिले. यामुळे महाविकास आघाडीच्या पदरी निराशा आली. तसेच कोल्हापूर महापालिकेची थांबलेली निवडणूक प्रक्रिया गतीने सुरू झाली. प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आता आरक्षणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. 31 मे रोजी आरक्षण सोडत निघणार आहे. ही सोडत ओबीसी आरक्षणा शिवाय होत आहे.

79 प्रभागात संधी मात्र, तगडे आव्हान
ओबीसी आरक्षणाची सध्याची स्थिती कायम राहिल्यास ओबीसी उमेदवारांना कोल्हापूर महापालिपेच्या निवडणुकीत ओपनमधील 79 वॉर्डमधून निवडणूक लढवावी लागणार आहे. यामध्ये 39 खुले आणि 40 महिला खुला प्रवर्गाचा समावेश आहे. मात्र, ओपनमधील तगड्या उमेदवारांचा त्यांना सामना करावा लागणार आहे.

ओबीसी आरक्षण रद्द ठरणार प्रचाराचा मुद्दा
ओबीसी आरक्षण रद्द झाल्यावरून महाविकास आघाडी आणि भाजप एकमेंकाकडे बोट करत आहेत. मध्यप्रदेशमध्ये ओबीसी आरक्षण टिकले मात्र, महाराष्ट्रात आरक्षण टिकले नाही. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षण रद्द प्रचाराचा मुद्दा ठरणार आहे. याचा फटका नेमका कोणत्या पक्षाला बसणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

ओबीसी समोर दुहेरी संकट
कोल्हापूर महापालिका निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार होत आहे. जुने तीन ते चार प्रभाग आणि 17 ते 20 हजार मतदारांचा एक वॉर्ड झाला आहे. यामुळे अगोदरच सर्वसामान्य उमेदवारांना निवडणुकीत टिकाव लागणे कठीण बनले होते. यामध्येच ओबीसींचे आरक्षण रद्द झाले आहे. यामुळे मनपा निवडणुकीत ओबीसीमधील उमेदवारांचा प्रवास खडतर असणार आहे. त्यांना ओपनमधून निवडणूक लढवावी लागणार आहे. 20 हजाराचा मतदार संघ आणि खुला प्रवर्ग असा दुहेरी संकट ओबीसी उमेदवारासमोर असणार आहे.

तर पुन्हा आरक्षण सोडत निघणार काय?
कोल्हापूरमध्ये अतिवृष्टी होते. यामुळे मनपा निवडणूक ऑक्टोंबरमध्येच होणार आहे. या दरम्यान, मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ओबीसींना आरक्षण देण्याचा निर्णय झाल्यास आता काढणारी आरक्षण सोडत रद्द होऊन नव्याने काढली जाणार काय असा सवालाही उपस्थित होत आहे.

एकूण प्रभाग -92
महिलांसाठी एकूण आरक्षित प्रभाग-46
अनुसूचित जाती-12 (6 महिला)
अनुसूचित जमाती-1
खुले प्रभाग-39
खुले प्रभाग (महिला)-40

Related Stories

शिवसेना हा कन्फ्यूज्ड पक्ष : देवेंद्र फडणवीस

Rohan_P

आठवड्यानंतर रेल्वे सेवा सुरु

Abhijeet Shinde

घरफाळा भरला तरच मिळणार जन्म, मृत्यूचा दाखला !

Abhijeet Shinde

काँग्रेसच्या सुनील जाखड यांचा भाजप प्रवेश

Abhijeet Shinde

कोल्हापूर : रांगणा किल्ल्यावरील दरीत पडलेली तोफ गडावर आणण्यात यश

Abhijeet Shinde

‘कोजिमाशि’साठी उद्या मतदान

Abhijeet Shinde
error: Content is protected !!