Tarun Bharat

KOLHAPUR: NDRF दाखल, शहरात एक तर शिरोळमध्ये दुसरे पथक तैनात

Advertisements

कोल्हापूर जिल्ह्यात एनडीआरफच्या दोन तुकड्या दाखल, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी साधला जवानांशी संवाद

कोल्हापूर, : संततधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीची पाणीपातळी इशारा पातळीकडे सरकत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एनडीआरफच्या २ तुकड्या दाखल झाल्या. एक तुकडी शिरोळकडे रवाना झाली असून दुसरी तुकडी मंगळवारी रात्री सव्वा ९ च्या दरम्यान कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या तुकडीचे प्रमुख व जवानांची भेट घेऊन बचाव व मदत कार्याच्या अनुषंगाने संवाद साधला. यावेळी निरीक्षक बृजेश कुमार रैकवार, शरद पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.

एनडीआरफच्या २ तुकड्यांपैकी एक तुकडी कोल्हापूर शहरात तर दुसरी तुकडी शिरोळ तालुक्यात काम करेल. प्रत्येक तुकडीत २५ जवानांचा समावेश आहे.
निरीक्षक बृजेश कुमार रैकवार आणि शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर मधील टीम काम करेल. तर निरीक्षक लोकेश रत्नपारखी व प्रशांत चिता यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ येथील टीम काम करणार आहे.

आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास एनडीआरएफचे जवान व जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक बचाव व मदत कार्य चांगल्याप्रकारे करेल, त्यामुळे कोल्हापूरकरांनी घाबरु नये, असे आवाहन यावेळी निरीक्षक बृजेश कुमार रैकवार यांनी केले.

Related Stories

राफेल लढाऊ विमानं उद्या हवाई दलात सामील होणार

datta jadhav

आता कर्नाटकात नो एंट्री

Archana Banage

ओमिक्रॉन दक्षिण आफ्रिकेतून नाही तर युरोपमधून पसरला

Archana Banage

सरकार वाचविण्यासाठी उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना फोन?

datta jadhav

…तर आम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल; गडकरींचा मुख्यमंत्री ठाकरेंना पत्राद्वारे गंभीर इशारा

Archana Banage

राज्यात 1628 शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान कधी?

Archana Banage
error: Content is protected !!