Tarun Bharat

मणेरमळा व गडमुडशिंगी येथील दोन घरफोड्या उघडकीस, सराईत चोरटा जेरबंद

सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत, गांधीनगर पोलिसांची कारवाई

उचगाव/वार्ताहर

दिवसाढवळ्या घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्यास गांधीनगर पोलिसांना सव्वा दोन लाखाच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात यश आले. निखिल सुनील खडके रा. साळोखे गल्ली कळंबा ता.करवीर असे सराईत चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा दोन्ही घरफोडीतील सव्वादोन लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२/३/२२ आणि ३१/८/२२ रोजी दिवसा ढवळ्या दोन घरफोड्यांचे गुन्हे दाखल झाले होते. मणेरमळा व गडमुडशिंगी येथे या घरफोड्या झाल्या होत्या. गांधीनगर पोलीस ठाण्याचे सपोनि सत्यराज घुले यांनी तपास पथक नेमून तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. सीसीटीव्ही फुटेज आणि पोलीस नाईक आकाश पाटील यांच्या खबऱ्याकडून सराईत चोरट्याचा शोध घेतला. संशयित आरोपी निखिल खडके याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता मणेरमळा व गडमुडशिंगी येथील दोन्ही घरफोडीत गेलेले सोन्याचे दागिने त्यामध्ये लक्ष्मी हार, नेकलेस, कानातील झुबे, मंगळसूत्र, फुले, बोरमाळ, लहान मुलांच्या अंगठ्या, असा एकूण २ लाख २४ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल संशयित आरोपीच्या घरातून जप्त केला.

दरम्यान, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, उपविभागीय अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात आला. तर हा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात, सह.फौजदार सुनील गायकवाड, हवालदार मोहन गवळी, दिगंबर सुतार, आकाश पाटील, आयुब शेख, सुनील कुंभार यांनी केला.

Related Stories

‘आरोग्यसेवक’ पदासाठी कोल्हापूर जिल्ह्यात 7 हजार परीक्षार्थी

Archana Banage

इचलकरंजी पालिकेच्या क्वॉटर्समधील जुगार अड्डावर छापा; कर्मचाऱ्यासह ९ जण अटकेत

Archana Banage

महाशिवरात्रीच्या आधी विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यात येईल- संभाजीराजे

Archana Banage

कोल्हापूर : बाप्पांनी दिली अर्थचक्राला गती

Archana Banage

Kolhapur; पंचगंगेची मच्छिंद्री आता आठवणीपुरती…

Abhijeet Khandekar

पुलाची शिरोलीत ३५.५७ लाखांच्या विकास कामांचे उद्धाटन

Archana Banage