Tarun Bharat

कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी सुमारे ६१ टक्क्यांवर मतदान

कोल्हापूर प्रतिनिधी

कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी आज मोठ्या चुरशीने मतदान पार पडलं. जवळपास ३५८ मतदान केंद्रावर हि प्रक्रिया पार पडली. सकाळी सात वाजल्यापासून या मतदान प्रक्रियेला सुरवात झाली. सकाळच्या सत्रात मतदारानी संथ गतीनं मतदान केलं. तर दुपारनंतर मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या होत्या. तर केंद्राबाहेर काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी सरासरी ५५.२७ टक्के मतदान झालं..२ लाख ९१ हजार ७९८ पैकी १ लाख ६१ हजार २८९ इतकं मतदान झालं. तर दिवसभरात ६१ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. १५ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीन मध्ये लॉक झालं असून येणाऱ्या १६ एप्रिल रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळं राज्याचं लक्ष या निकालाकडं लागलं आहे.

Related Stories

तारापूर एमआयडीसीतील कंपनी जळून खाक

datta jadhav

नेपाळच्या नवीन नकाशाला विरोध करणाऱ्या महिला खासदाराची पक्षातून हकालपट्टी

datta jadhav

अवंतीपोरात ‘जैश’च्या टॉप कमांडरचा खात्मा

datta jadhav

अविनाश भोसले यांची पुण्यातील 4 कोटींची संपत्ती जप्त

datta jadhav

कासारवाडी पाणी प्रश्न खा.माने यांच्या प्रयत्नातुन मार्गी

Archana Banage

कोल्हापूर : “गणपती बाप्पा मोरया कोरोनाला हरवूया”च्या जयघोषात घरगुती बाप्पाचे आगमन

Archana Banage