Tarun Bharat

भाजपला बदनाम करण्याचं विरोधकांचं काम – केशव उपाध्ये

ऑनलाईन टीम/तरुण भारत

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सोमवारी मतदानाच्या पूर्वसंध्येला भाजपच्या माजी नगरसेविकेच्या कार्यालयात पैशाची पाकिटं सापडली. यावेळी पोलिसांनी भाजपच्या ५ कार्यकर्त्यांना अटक केली. यावरुन भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (congress) शाब्दिक युद्ध सुरु आहे.

कालच्या घडलेल्या प्रकावर कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील (satej patil) यांनी भाष्य करताना भाजपवर हल्लाबोल केला. जनाधार नसल्याने भाजपचा (BJP) पैसे वाटून मतं विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघात सतेज पाटील यांनी केला. तर भापचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पराभव स्पष्ट दिसू लागल्यामुळे महाविकास आघाडी सरकारकडून भाजप कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (keshav upadhye) यांनाही यावर प्रतिक्रिया देत, विरोधकांवर टीका केली आहे.

दरम्यान, मतदानाच्या पूर्वसंध्येला सापडलेली पैशाची पाकिटे आणि भाजप कार्यकर्त्यांवर केलेली कारवाई यावर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्याही प्रकारचे पैसे वाटण्याचं काम भाजपकडून सुरु नाही. हे सर्व भाजप विरोधकांचा अपप्रचार असू शकतो. भाजपला बदनाम करण्याचे विरोधकांचे काम सुरू आहे.

Related Stories

कोल्हापूर : मुरगुडमध्ये अत्याधुनिक बोटींसह पुण्याहून एनडीआरएफची टीम तैनात

Archana Banage

Kolhapu: प्रेमसाई चॅरिटेबल ट्रस्टचे पालक- विद्यार्थी सेमिनार

Abhijeet Khandekar

ज्यांना मुंबईतील बुजविता आले नाहीत खड्डे, त्यांना विद्यापीठांचे कशाला करायचे होते राजकीय अड्डे ; आशिष शेलारांची ठाकरेंवर टीका

Archana Banage

LPG गॅस सिलेंडरच्या दरात वाढ

datta jadhav

महे गावातून 10 गाई व एक म्हैस चोरीस

Archana Banage

हरिद्वार : कुंभमेळ्यात लाखो भक्तांची गर्दी; कोरोनाच्या नियमांचे तीनतेरा

Tousif Mujawar