ऑनलाईन टीम/तरुण भारत
कोल्हापूर उत्तर विधानसभा (kolhapur north election) मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी (bypoll) आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला (voting) सुरुवात झाली आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत सरासरी ६.९६ टक्के मतदान झाले आहे. सकाळच्या सत्रात १२ हजार १८७ पुरुष मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तर ८ हजार १३६ महिला मतदारांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
सकाळच्या सत्रात पुरुषांच्या मतदानाची सरासरी ८.३६ टक्के इतकी आहे. तर महिलांच्या मतदानाची सरासरी ५.५६ टक्के आहे.