Tarun Bharat

मुलाचे भांडण सोडवताना धक्काबुक्कीत वृद्धाचा मृत्यू

चंदूर वार्ताहर

रुई येथे काल म्हसोबा माळ येथील कमलाकर गल्लीमध्ये झालेल्या हाणामारीत प्रकाश लक्ष्मण माने ( वय 66 ) यांचा मृत्यू झाला आहे. रुई येथीलच संशयित आरोपी मारुती सिद्धू चंपू (वय 45)सेंट्रींग कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांच्याकडे विनोद प्रकाश माने हा कामाला येतो म्हणून रुपये 32 हजार इतका ऍडव्हान्स घेतला होता. पैसे घेऊनही आठ दिवसापासून कामावर येण्यास टाळाटाळ करत असल्याचे पाहून संशयित आरोपीने त्याचा जाब विचारण्यासाठी प्रकाश माने यांच्या घरी गेला असता दोघांमध्ये वादावादी होऊन हाणामारी झाली. संशयित आरोपीने विनोद यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असल्याचे पाहून त्याचे वडील प्रकाश लक्ष्मण माने हे भांडण सोडविण्यास गेले व संशयित आरोपीनी त्यांनाही धक्काबुक्की केली त्यामुळे ते फरशीवर पडून जागीच मयत झाले. याबाबत नातेवाइकांनी हातकणंगले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. घटनास्थळी पोलिस उपाधीक्षक बी.बी. महामुनी, पोलीस निरीक्षक के. एन. पाटील, बीट अंमलदार सुरजीत चव्हाण,पोलीस पाटील नितेश तराळ आदींनी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Stories

दहा वर्ष स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारचा ठेका रद्द

Archana Banage

शाहू विचार जागर यात्रेचे साताऱ्यात स्वागत; ज्येष्ठ विचारवंत आ.ह.साळुंखे यांनी दिल्या शुभेच्छा

Abhijeet Khandekar

पंतप्रधानांची युरोपीयन युनियनशी चर्चा

Archana Banage

ऑल इंडिया युथ गेममध्ये कुंभोजच्या क्रिशने पटकावले सुवर्णपदक

Archana Banage

बिकिनी, घुंघट, जीन्स… ; प्रियंका गांधींची हिजाब प्रकरणावर प्रतिक्रिया

Archana Banage

राजू शेट्टी पूरग्रस्त दौऱ्यावर

Archana Banage