10 हजारचे बक्षिस जाहीर
शिरोळ / प्रतिनिधी
चिंचवाड (ता.शिरोळ) येथील नंदीवाली वसाहत ककडेमळा येथे राहणार्या सौ. चंपाबाई ककडे या वृद्ध महिलेचा गळा दाबून खुन करणार्या इसमास कोल्हापुरच्या स्थानिक गुन्हे आन्वेषणच्या पोलीस पथकाने अवघ्या 72 तासात, आरोपीस अटक केली. अतंत्य संवेदनशिल असेलेल्या या गुन्ह्याचा तपास करणे, स्थानिक पोलीसांना जिकीरीचे बनले होते. गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीसांनी मुख्य सुत्रधार प्रकाश नंदिवाल यास अटक केली आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांनी या पथकास दहा हजार रूपयाचे बक्षिस जाहीर केले.
अधिक पहा Video- आम्ही आशा व्यक्त करतो, एटीएस चांगला तपास करेल : मेघा पानसरे
चिंचवाड येथील ककडे मळ्यात राहणार्या भुपाल ककडे, व त्यांच्या पत्नी चंपाबाई ककडे हे शेतातील घरात रहात होते. 30 जुलै रोजी संशयीत आरोपी प्रकाश लक्ष्मण नंदीवाले, वय वर्षे 33, राहणार नंदीवाले वसाहत शिरोळ. चोरीच्या इराद्याने ककडे यांच्या घरावर दोन दिवस पाळत ठेवला होता. 30 जुलै रोजी 8.30 ते 9 च्या दरम्यान त्यांच्या घरात पिण्यासाठी पाणी मागण्याचा बहाना करून गेला. मयत चंपाबाई ककडे यांनी त्यास पिण्यासाठी पाणी दिले. संशयीत आरोपी पाणी पिवून झाल्यावर आचानकपणे घरात घुसन त्यांच्यावर झडप घालून, खाली पाडून त्यांचा गळा दाबून खुन करून, गळ्यातील व कानातील सोन्याचे दागीने जबरदस्तीने काढून घेवून फरार झाला. सदर घटनेची फिर्याद शिरोळ पोलीसात 31 जुलै रोजी दाखल करण्यात आली होती.
या प्रकरणी शिरोळ पोलीसांनी संशयीत म्हणून एकास ताब्यात घेतले होते. सदरच्या घटनेने संपुर्ण शिरोळ व परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधिक्षक तिरूपती काकडे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास करताना गुन्ह्याच्या ठिकाणी मिळून आलेल्या टोपीच्या वर्णनावरून, येणार्या जाणार्या मार्गावरील सीसीटिव्ही फुटेज पहाणी केली. यामध्ये टोपी घातलेला संशयीत आरोपी मोटार सायकलवर दिसुन आल्यावर, त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. प्रकाश नंदिवाले हा चौंडेश्वरी सुतगिरणी ते शिरोळ या रोडने जात असताना, त्यास ताब्यात घेवून चौकशी केली असता. सदरचा गुन्हा केल्या असल्याचे त्याने कबुल केले. प्रकाश नंदिवाले यास पोलीसांनी अटक केली असुन, पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे करीत आहेत.