Tarun Bharat

Kolhapur : दांडक्याने खून केल्याप्रकरणी एकास जन्मठेपेची शिक्षा व दंड

शिरोळ  प्रतिनिधी

खून प्रकरणी नांदणी, ता. शिरोळ येथील कैलास द. साळवे यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. बी. मोरोवसो यांनी जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये रकमेच्या दंड अशी शिक्षा ठरवण्यात आली आहे.

याबाबतची पार्श्वभूमी अशी की, आरोपी कैलास साळवे याने मयत अमर जयसिंग नलवडे याचा लाकडी दांडक्याने ता. ४.९.२०१४ रोजी डोक्यात वार करुन खून केला. त्याबाबत फिर्यादीने भा.द. वि.स.कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता. त्याप्रमाणे शिरोळ पोलीस ठाणे येथे गुन्हा 1 रजि. नं. ५३/२०१४ प्रमाणे आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविणेत आला होता. सदर गुन्हयाचा संपूर्ण तपास शिरोळ पोलीस ठाण्याचे तात्कालीन सहायक पोलीस निरीक्षक श्री. डी. बी. कदम व पोलीस निरीक्षक श्री. व्ही. बी. जगताप यांनी केला व आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र पाठविले होते. याकामी सरकार पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले होते.

या गुन्हयाची तक्रार मयत अमर नलवडे याची बहिण मनिषा वडर हिने दिलेली होती. कोर्टाने झालेला साक्षीपुरावा व सरकारी वकिल उदय मोहन कुलकर्णी यांनी केलेला युक्तीवाद व त्यांनी दिलेल्या सर्वोच्च न्यायालयातील निवाड्याचा संदर्भ घेवून अतिरिक्त सत्र न्यायाधीशसो जयसिंगपूर जी. बी. गुरव यांनी आरोपीस जन्मठेप व रु. ५०००/- दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. सदरकामी सरकारी पक्षातर्फे शिरोळ पोलीस ठाण्याचे, पोलीस कॉ.  श्री. संदिप हेगडे यांनी सहकार्य केले ,,

Related Stories

नांदणीच्या शेतकऱ्याचा तेरा दिवसांनी मृतदेह मिळाला

Archana Banage

दोन आठवडयात कोल्हापूर- बेंगळूर विमानसेवा सुरू होणार- खासदार महाडिक

Abhijeet Khandekar

मराठा आरक्षणाला माझा जाहीर पाठिंबा : संजय घाटगे

Archana Banage

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन; शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष : राजू शेट्टी

Abhijeet Khandekar

कुंभोज येथे प्रहार अपंग संघटनेच्यावतीने रविवारी दिव्यांग मेळाव्याचे आयोजन

Archana Banage

खून प्रकरणी वृद्धास जन्मठेपेची शिक्षा

Archana Banage