Tarun Bharat

Kolhapur; कॉलेजच्या निरोप समारंभासाठी चाललेल्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू

Advertisements

वारणानगर / प्रतिनिधी

कोडोली काखे ता. पन्हाळा मार्गावर काईगंडे मळा येथे दुचाकी गाडी स्लीप होवून पडल्याने ओंकार चंद्रकांत इंगळे (वय २१) (रा.नाजरे गल्ली बतीस शिराळा) या महाविद्यालयानी तरुणाचा उपचारादरम्यान मंगळवारी दुपारी मृत्यु झाला. या घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांच्याकडून व घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, ओंकार हा वारणानगर येथील फॉर्मसी कॉलेजमध्ये अंतीम वर्ष पदवी अभ्यासक्रमात शिकत होता. मंगळवारी अंतीम वर्षातील विद्यार्थाचा निरोप समारंभ कार्यक्रम असल्याने शिराळा येथून दोन चाकीवरून एकटाच वारणानगरला येत होता. कोडोली काखे रस्त्याजवळील एम.डी. पाटील जनावरच्या शेड जवळ रस्त्यावरील असलेल्या मातीवरून मोटरसायकल घसरल्याने तो डांबरी रस्त्यावर पडला. त्याच्या डाव्या बाजूच्या छातीच्या बरगडीस जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर ओंकार हा सुमारे अर्धा तास रस्त्याकडेलाच बेशुद्ध अवस्थेत पडून होता. हा प्रकार स्थानिक लोकांना समजल्यावर ओंकार याला तातडीने कोडोली येथील यशवंत धर्मादाय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ओंकारला बोलता येत नसलेने नातेवाईकांचा शोध घेणे अवघड झाले होते. डॉक्टरांनी त्यांला नाव विचारले असता त्यांने त्यांच्या जवळ असलेला मोबाईल चेहऱ्यासमोर धरा असे खूनविले. मोबाईल लॉक निघताच त्यांचे वडिल व इतर नातेवाईकांना संपर्क साधणे शक्य झाले.

यांच्या फुफुसाला जोराचा मार लागल्याने अंतर्गत रक्तस्त्राव झाला होता. उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला. ओंकारच्या अपघाताची बातमी वर्गातील मित्रांना तसेच शिराळा येथील नातेवाईकांना समजताच त्यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. तरूण मुलगा अशा प्रकारे जाण्याने त्यांच्या वडीलांनी हॉस्पिटलमध्ये आक्रोश केला. त्याच्या पश्चात आई वडील व एक लहान भाऊ आहे. वडीलांचा छोटा व्यवसाय असून यावरच ते आपल्या कुंटुबांचा उधरनिर्वाह व मुलांचे शिक्षण करीत होते. कोडोली उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणेत आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पवार करीत आहेत.

Related Stories

सादळे गावातील सिध्देश्वर मंदिरातील शिवलिंगाची चोरी

Sumit Tambekar

Kolhapur : शनिवारपर्यंत जनावारांचे लसीकरण पुर्ण करणार- जिल्हाधिकारी रेखावार

Abhijeet Khandekar

बेंगळूर : एचएएलमध्ये १६० बेड्चे कोविड केअर सेंटर सज्ज

Abhijeet Shinde

सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक केंद्र उभारणीच्या जागेबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता

Abhijeet Shinde

नैसर्गिक कि सट्टेबाजीमुळे बांधकाम साहित्याच्या किंमती झालेली वाढ

Patil_p

सांगरुळ फाटा परिसर लॉकडाउन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!