Tarun Bharat

Kolhaour; तीन लाखाचा किमतीच्या सोने चोरीचा छडा; महिला ताब्यात

पन्हाळा- प्रतिनिधी

पोर्ले ता.पन्हाळा येथील घरातील लोखंडी तिजोरीचे लॉक उघडुन तीन लाख किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याप्रकरणी एका महीलेला ताब्यात घेतले असून तिच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या बाबत मिळालेली माहीती अशी की, पोर्ले ता. पन्हाळा येथील दिपक भागाजी काशीद यांच्या घरातील लोखंडी तिजोरीतील चावीने लॉक उघडुन सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती. या दागिन्यामध्ये चिताक 40 ग्रँम वजनाचे, सोन्याचा लप्पा 12.5 ग्रँम, सोन्याची चेन 10 ग्रँम, सोन्याची अंगठी, बोरमाळ, कानातील टॉप्स असा तीन लाखाचा मुद्देमाल होता. दिपक काशीद यांनी याबाबतची फिर्याद पन्हाळा पोलिसांत दिल्यानंतर पोलिसांनी तपास करून
संशयीत महिला प्रियांका सरदार पाटील (वय 32) हिला ताब्यात घेवुन चौकशी केली असता तिने चोरीचा गुन्हा कबुल केला. त्यानुसार तिच्या कडुन चोरीला गेलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. अधिक तपास पन्हाळा पोलिस करत आहेत.

Advertisements

Related Stories

१०० सेकंद कृतज्ञतेचे..ओडिशा येथून शाहू महाराजांना अभिवादन

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : खोतवाडीतील युवकाला बेदम मारहाण

Abhijeet Shinde

कोगेतील धोकादायक वळणामुळे अपघात, जीवित हानी टळली

Abhijeet Shinde

…यासाठी राजीनामा दिला नाही : सभापती जमादार

Abhijeet Shinde

आप्पे रिक्षा-मोटरसायकल धडकेत महिलेचा मृत्यू; एक गंभीर

Sumit Tambekar

प्रायोगिक लसीकरण उद्यापासून

Abhijeet Shinde
error: Content is protected !!